Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • फसवणूक.. फसवणूक.. फसवणूक! ‘पुण्यात निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी’कडून नागरीकांची फसवणूक
Top News

फसवणूक.. फसवणूक.. फसवणूक! ‘पुण्यात निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी’कडून नागरीकांची फसवणूक

Niva Bupa Health Insurance Scam

Niva Bupa Health Insurance company deceives citizens : फसवणूक.. फसवणूक.. फसवणूक पुण्यात नागरीकांची (Citizens cheated in Pune) दिवसा ढवळ्या फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘आयडीएफसी फर्स्ट बँक’ (IDFC First Bank Pune) यांच्या मार्फत ‘निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी’कडून (Niva Bupa Health Insurance Company) नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यात येत असल्याचं उघड झालं आहे. हेल्थ इन्शुरन्स च्या नावाखाली पैसे गोळा करून नागरीकांची फसवणूक केल्याची तक्रार एका नागरीकांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काळात निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीत कोणीही इन्शुरन्स काढू नये असे आवाहन पिडित नागरीकाकडून (An appeal from the affected citizen) करण्यात आले आहे.

आयडीएफसी फर्स्ट बँक नवीन अकाउंट ओपन करणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स असल्याचं सांगतलं जातं. मात्र, हा इन्शुरन्स नेवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा दिला जातो. हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही. जेव्हा बिल क्लेम करण्याची वेळ येते, तेव्हा नेवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी आणि आयडीएफसी फर्स्ट बँक एकमेकांकडे बोट करतात. हाॅस्पिटल वाले पैशांसाठी परेशान करतात, आणि एकडे इन्शुरन्स वाले क्लेम करत नाहीत त्यामुळे अनेकजण मानसिक आणि आर्थिक बळी ठरत आहेत.

हेही वाचा – फसवणूक, मानसिक छळामूळे शेतकऱ्याची आत्महत्या; मुलाने केली पोलीसात तक्रार दाखल

नेवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी आणि आयडीएफसी फर्स्ट बँक हात वर 

फसवणूक झालेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवार दि. १८ डिसेंबर रोजी मयुरी नामक ३ वर्षाच्या चिमुकलीला खुप ताप, सर्दी, खोकला, आणि उलट्यांचा त्रास होत होता. त्यामुळे वडील नजिकच्या औंध येथील ‘संजीवनी मेडी पाॅईंड’ या रुग्णालयात मुलीला दाखल करण्यात आले. वडिलांकडे ‘नेवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा इन्शुरन्स’ आहे. मात्र, जेव्हा २० डिसेंबर रोजी डिस्चार्ज देण्याची आणि बिल देण्याची वेळ आली तेव्हा नेवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी आणि आयडीएफसी फर्स्ट बँक येथील कर्मचाऱ्यांनी हात वरी केले. त्यामुळे फसवणूक झालेली व्यक्ती सध्या खुप मानसिक तणावात आहे. रुग्णालयाने ३० हजार रुपयांचे बील मागितलं आहे. तर घरी जायचंय म्हणत ती लहान चिमुकली मोठ-मोठ्याने रडत असल्याचे सांगण्यात आलं आहे. 

३ वर्षाची चिमुकलीचा घरी जाण्यासाठी वडीलांकडे हट्ट

दरम्यान, ती ३ वर्षाची चिमुकली घरी जाण्यासाठी वडीलांकडे हट्ट धरून बसली आहे. वडीलांकडे रुग्णालयाचे एवढं मोठं बिल भरायला पैसे नाहीत, तर इकडे ज्या कंपनीचा इन्शुरन्स काढला आहे ती कंपनीचे कार्यालय नोयडा इथे आहे. त्यामुळे वडीलांना काय करावे समजत नाही. पुण्यासह राज्यातील नागरीकांनी अशा फसवणूक करणाऱ्या हेल्थ इन्शुरन्स कंपन्यापासून सावध राहिलं पाहिजे. तसेच नेवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी आणि आयडीएफसी फर्स्ट बँक या दोन्ही संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts