Nora Fatehi in Controversy Over ‘Sarke Chunar Teri Sarke’ Song: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘सरके चुनर तेरी सरके’ गाण्यामुळे नोरा फतेही संकटात. केंद्र सरकारने गाण्यावर बंदी घातली आहे. चला जाणून घ्या कारण आणि सविस्तर प्रकरण
कॅनडामध्ये जन्मलेली बॉलिवूड स्टार अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या कन्नड चित्रपट ‘केडी डेव्हिल’ मधील तिच्या ‘सरके चूनर तेरी सरके’ या गण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हे गाणं हिंदू व्हर्जन असून यातील काही शब्द आणि दृश्ये अनेकनासाठी अस्वीकार्य ठरल्याने सरकार आणि सामाजिक संस्थांकडून तिला विरोधाचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा: Home Garden Spices: बाजारातील मसाले विसरा! घरच्या गार्डनमध्ये ‘हे’ 5 रोप लावा
नेमका काय प्रकरण आहे?
केंद्रीय सरकारने या गाण्यावर बंदी घातली आहे. त्यानंतर, नोरा फतेहीचा कामाचा परवाना (वर्क परमिट) रद्द करणे आणि तिला भारतातून हद्दपार करण्याची मागणी काही वकिलांच्या टीमने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली आहे. या मागणीसह, राष्ट्रीय महिला आयोग (NCW) नेही प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
वादाचे मुख्य मुद्दे
गाण्यातील शब्द अत्यंत अश्लील आणि लैंगिकदृष्ट्या उत्तेजक मानले जात आहेत.
गाण्यातील दृश्ये सार्वजनिक नैतिकता आणि महिलांच्या प्रतिष्ठेला अपायकारक असल्याचा आरोप केला जात आहे.
गीतकार रकीब आलम यांनी या प्रकरणाबाबत आरोप केला की, मूळ कन्नड गाण्याचे हिंदी भाषांतर निर्देशकाने जोरजबरदस्तीने केले आहे.
संबंधित कायदे आणि युक्तिवाद
वकिलांच्या याचिकेत असे म्हटले आहे की, नोरा फतेहीने परदेशी नागरिक कायदा, १९४६ (Foreigners Act) आणि इतर संबंधित कायद्यांचे उल्लंघन केले आहे.
यासोबतच, त्यांनी खालील कायद्यांचा संदर्भ दिला:
भारतीय न्याय संहिता
महिलांचे अश्लील चित्रण प्रतिबंध कायदा, १९८६
माहिती तंत्रज्ञान कायदा, २०००
वकिलांचा युक्तिवाद असा आहे की, अशा गाण्यांमुळे अश्लीलतेला प्रोत्साहन मिळते आणि महिलांना वस्तू म्हणून दाखवले जाते, ज्यामुळे सार्वजनिक सभ्यता आणि सुव्यवस्थेवर परिणाम होतो.
प्रकरणाची व्यापक दखल
फक्त गृह मंत्रालयाकडेच नव्हे, तर माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (CBFC), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांसारख्या विविध संस्थांकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे नोरा फतेहीसाठी परिस्थिती गंभीर बनली आहे. या वादामुळे नोरा फतेही पुन्हा एकदा विवादाच्या केंद्रस्थानी आली असून, तिच्या बॉलिवूड करिअरवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












