Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • पद्म पुरस्कार २०२६ ची घोषणा! महाराष्ट्रातील खालील व्यक्तींचा पुरस्कारने सन्मान
Top News

पद्म पुरस्कार २०२६ ची घोषणा! महाराष्ट्रातील खालील व्यक्तींचा पुरस्कारने सन्मान

Padma Awards 2026 Maharashtra Honourees

Padma Awards 2026 Maharashtra Honourees : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने सन 2026 च्या प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यंदाच्या यादीत महाराष्ट्रातील मातीशी नातं सांगणाऱ्या आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजमनावर ठसा उमटवणाऱ्या अनेक दिग्गजांचा गौरव करण्यात आला आहे. कला, कृषी आणि संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाला असून, यामुळे राज्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवात भर पडली आहे.

हेही वाचा – मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह सहा जणांना अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाची डाक्टरेट

पद्मविभूषण पारितोषिक विजेते

1) धर्मेंद्र सिंह देवल, कला (मरणोत्तर)

पद्मभूषण पुरस्कार विजेते

1) अलका याग्निक (कलाक्षेत्र)
2) पियुष पांडे, कलाक्षेत्र (मरणोत्तर)
3) उदय कोट उद्योग आणि व्यापार)

पद्मश्री पारितोषिक विजेते

1) आर्मीदा फर्नांडिस (मेडिकल )
2) अशोक खाडे ( ट्रेड आणि इंडस्ट्री)
3) भिकल्या लाडक्या धिंडा (कलाक्षेत्र )
4) जनार्दन बाबुराव बोठे ( सामाजिक कार्य)
5) जुजर वासी ( विज्ञान आणि अभियांत्रिकी )
6) माधवन रंगनाथन ( कलाक्षेत्र )
7) रघुवीर खेडेकर ( कलाक्षेत्र )
8) रोहित शर्मा (क्रीडा)
9) सतीश शहा (कलाक्षेत्र) मरणोत्तर
10) सत्यनारायण नुवाल ( ट्रेड अँड इंडस्ट्री )
11 श्रीरंग देवबा लाड (शेती)

रघुवीर खेडकर : खेडकर हे एक लोकनाट्य कलाकार आहेत. या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

भिकल्या लडक्या धिंडा : 89 वर्षीय धिंडा यांची असामान्य तारपावादक म्हणून ओळख आहे. ते पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याच्या वाळवंडे गावचे आहेत. आपल्या वडिलांकडूनच त्यांना तारपावादन आणि तारपा निर्मीतीचा वारसा मिळाला. आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.

श्रीरंग देवबा लाड : लाड हे परभणी जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. कापसाच्या उत्पन्न वाढीसाठी त्यांनी संशोधन केले आहे. त्यांच्या या कार्यासाठीच त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे.

आर्मिदा फर्नांडीस : डॉ. आर्मिदा फर्नांडिस या मुंबईतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि स्नेहा या संस्थेच्या संस्थापिका आहेत. आशियातील पहिली मानवी दुग्धपेढी स्थापन करणे, नवजात बालकांचा मृत्यूदर कमी करणे आणि झोपडपट्टीतील माता-बालकांच्या आरोग्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले आहे. यासाठी पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा /उपक्रमांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ दिला जातो. उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

२०२६ या वर्षासाठी १३१ पद्म पुरस्कार प्रदान

हे पुरस्कार भारताचे राष्ट्रपती दरवर्षी मार्च/एप्रिलच्या सुमारास राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या समारंभात प्रदान करतात. २०२६ या वर्षासाठी १३१ पद्म पुरस्कार प्रदान करण्यास राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे. या यादीमध्ये ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts