छत्रपती संभाजीनगर : कोण बनेगा करोडपती या शो मध्ये सर्वजण आपापले नशीब आजमावत असतात. यंदाच्या कोण बनेगा करोडपती शो मध्ये आत्तापर्यंत साधारणता चार ते पाच व्यक्ती विजेता ठरलेले आहेत. परंतु तुम्हाला माहितीये का..? एका व्यक्तीने कोणतीही लाईफलाईन न वापरता 50 लाख रुपये कमावले आहे. हा व्यक्ती मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील असून कोण बनेगा करोडपती मध्ये त्याने इतिहास रचला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बालानगर जवळच असलेल्या तंडबुद्रक तांड्यावरील कैलास कुंटेवाड या शेतकऱ्याने कोण बनेगा करोडपती मध्ये कोणतीही लाईफ लाईन न वापरता 50 लाख रुपये जिंकले आहे. या शेतकऱ्याने एक करोड रुपयांच्या प्रश्नावर माघार घेतली.
असे आहे कैलास कुंटेवड यांचे जीवन
कैलास कुंटेवड यांचे शिक्षण जेमतेम बारावी असून त्यांची परिस्थिती अतिशय हलाकीची आहे. या परिस्थितीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही, त्यांचे वडील शेतात मोलमजुरी करून उपजीविका भागवत होते. त्यामुळे कैलास देखील वडिलांसोबत मोलमजुरी करून घर चालवत होते. त्यांच्याकडे केवळ दोन एकर कोरडवाहू शेती आहे आणि या शेतीवर ते आपले उद्योग भागवत असत. परंतु आता त्यांचे नशीब पालटल्याचे दिसून येत आहे.
कोण बनेगा करोडपती मधून त्यांना एक दिवस फोन आला त्यांना वाटलं कोणीतरी मजाक घेत आहे. त्यांनी तेव्हा मनावर घेतले नाही. त्यांना पुन्हा फोन आला तेव्हा त्यांनी फोन उचलला. त्यानंतर कोण बनेगा करोडपती मधून बोलतोय असं त्यांना सांगण्यात आले, परंतु त्यानंतर त्यांनी त्या गोष्टीची खातरजमा केली आणि पहिल्यांदा ते कोलकत्ता या ठिकाणी ऑडिशनला गेले. दोन वेळेस फोन आला परंतु ते फोन उचलू शकले नाही परंतु तिसऱ्या वेळेस त्यांनी मुंबई गाठली. आणि चक्क पन्नास लाख रुपये जिंकले.
दिवाळी दसरा उत्साहात साजरा होईल
या शेतकऱ्याने स्वप्नात देखील विचार केला नव्हता की आपण 50 लाख रुपये जिंकू शकतो. या 50 लाख रुपये जिंकल्याने कुठेतरी आता या शेतकऱ्याच्या घरी दिवाळी दसरा उत्साहात साजरा होईल. महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकरी परेशान असून पावसाने शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेला आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा समान करीत आहे.
राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकार ही कोणताही निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही अशा या सर्व गोष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून वाहून गेल्या आहे. अनेक शेतकऱ्यांना आपली दिवाळी दसरा कसा साजरा करावा हा प्रश्न पडलेला आहे.