भारताच्या शेजारील देश पाकिस्तान येथील नद्यांना पूर आला आहे. यामध्ये पंजाब प्रांतातील मोठ्या नद्यांना पूर आला. ज्यामुळे हजारो गावे पुराच्या पाण्यात वाहून गेली असून पंजाब प्रांतातील मोठ्या नद्यांना पूर आला आहे.
पाकिस्तान येथे मागील महिन्यात आलेल्या पुराने जनजीवन विस्कळीत झाले असून अजूनही तेथील पूरपरिस्थिती सुरळीत झालेली नाही. याठिकाणी पंजाब प्रांतातील रावी, सतलज आणि चिनाब यासारख्या मोठ्या नद्यांना पूर आला आहे. या पुरामुळे मोठी जीवित हानी झाली असून या दुर्घटनेत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून आणखी मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर या ठिकाणी असलेल्या 25 जिल्ह्यातील 4100 पेक्षा जास्त गावे पुरात वाहून गेली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार 26 ऑगस्ट पासून आतापर्यंत पंजाब मध्ये किमान 56 जणांचा मृत्यू झाला आहे. पुरात वाहून गेलेल्या लोकांना शोधण्यासाठी शोध मोहीम अजूनही सुरु आहे. PDMA चे महासंचालक इरफान अली काठिया यांनी पत्रकारांना सांगितले कि, पाकिस्तानात आलेल्या पुरजन्य परिस्थितीमुळे अंदाजे 4.1 कोटी लोक प्रभावित झाले असून प्रचंड प्रमाणात विस्थापनाचा सामना करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रभावित भागात 425 मदत छावण्या आणि तंबू नगरी स्थापन केल्या आहेत. या छावण्यांमध्ये तात्पुरता निवारा आणि अन्न पुरवले जात आहे.
यासोबतच 500 पेक्षा अधिक वैद्यकीय छावण्या या ठिकाणी कार्यरत असून याठिकाणी जखम संसर्ग आणि जलजन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या 1 लाख 75 हजार रुग्णांवर उपचार सुरु असून बचाव पथकांनी आतापर्यत 2 कोटीपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे. तसेच पंजाब कृषी क्षेत्रात उपजीविकेच्या संरक्षणासाठी 1.5 कोटीपेक्षा जास्त जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पाकिस्तानातील नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या पुरात 972 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर पंजाब प्रांतातील पिके, पशुधन आणि घरे उध्वस्त झाली आहे. हा पूर सिंधमध्ये देखील पसरत असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे रोख रकमेची कामाकरता असलेल्या दक्षिण आशियाई देशात अन्नधान्याची महागाई, अधिक संकटाचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.