PM Narendra Modi On Mamata Banerjee | आज आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women’s Day 2026) आहे. या खास दिनानिमित्त दिल्लीमध्ये (Delhi) आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते सुमारे 33,500 कोटी रूपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि करण्यात भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी जनतेला संबोंधित करताना पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगला सरकारवर आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवर निशाणा साधला. हा फक्त राष्ट्रपतींचा अपमान नसून भारताच्या संविधानाचाही अपमान आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
आज संपूर्ण देश आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत आहे. मात्र, काल पश्चिम बंगालमध्ये टीएमसी सरकारने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संथाल समाजाच्या मोठ्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी बंगालमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा सन्मान करण्याऐवजी टीमसी सरकारने पवित्र कार्यक्रचा बहिष्कार केला, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
द्रौपदी मुर्मू या स्वत:आदिवासी समाजातून आल्या आहेत, त्यामुळे त्या नेहमीच आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात. तरी देखील टीएमसी सरकारने या कार्यक्रमाचे व्यवस्थापन योग्यरीत्या केले नाही. हा फक्त राष्ट्रपतींचा अपमान नाही तर भारताच्या संविधाना आणि लोकशाहीच्या महान परंपरेचा देखील अपमान आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
पुढे ते म्हणाले, एका आदिवासी महिला राष्ट्रपतींचा अपमान करण्यात आला, यावरून टीएमसी पक्षाचे गलिच्छ राजकारण आणि सत्तेचा अहंकार दिसून येत असून बंगालची जनता लवकरच या सरकारचा चकनाचूर करून टाकेल. सत्तेचा अहंकार कधीही टिकत नाही. तसेच पश्चिम बंगालमधील जनता, आदिवासी समाज आणि देशातील सर्व महिला टीएमसी सरकारने केलेला हा अपमान कधीही माफ करणार नाही, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय? वाद कशावरून निर्माण झाला?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उत्तर बंगाल दौऱ्यावर होत्या. त्या दार्जिलिंग जिल्ह्यातील 9व्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेमध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या होत्या. हा कार्यक्रन सुरूवातील फांसीदेवा ब्लॉकमधील बिधाननगर येथे होणार होता. कारण तिथे संथाल आदिवासी समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहू शकले असते. पण, राज्य सरकारने गर्दी, सुरक्षा आणि इतर काही कराणे देत या कार्यक्रमाचे ठिकाण बागडोगरा विमानतळाजवळील गोसाईंपूर येथे आयोजित केले. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या बदलबाबत नाराजी व्यक्त केली आणि नवीन ठिकाण लहान असल्यामुळे अनेक लोकांना कार्यक्रमात सहभागी होता आले नसल्याची खंत व्यक्त केली. सोबतच या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा इतर कोणतेही मंत्री उपस्थित न राहिल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.












