Israel Prime Minister Benjamin Netanyahu Death | सध्या अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) यांच्यातील युद्धामुळे (War) संपूर्ण जगभरात तणावाचे वातावरण आहे. या तिन्ही देशांमधील युद्ध चांगलंच पेटलं आहे. एकिकडे अमेरिका-इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणचे दुसरे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई (Mojtaba Khamenei) हे जखमी झाले असल्याची माहिची समोर आली होती. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोजतबा खामेनेई जिवंत आहेत की नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. या घडामोडींदरम्यान आता इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांचा मृत्यू झाला असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यामुळे संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – “मोजतबा खामेनेई जिवंत नाही, जर ते जिंवत असतील तर…”, डोनाल्ड ट्रम्प यांचं खळबळजनक वक्तव्य
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूबाबत इस्त्रायल सरकारने काय दिली माहिती?
एकिकडे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मृत्यू झाला असल्याच्या बातम्या पसरवल्या जात असताना दुसरीकडे आता इस्त्रायल सरकारने नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या बातम्यांबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
मागील काही दिवसापासून पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची हत्या झाली असल्याच्या एक एआय जनरेटेड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. तर या व्हिडीओबाबतचे सर्व दावे इस्त्रायल सरकारने फेटाळून लावले आहेत.
पंतप्रधान नेतन्याहू यांच्या हत्येबाबतच्या सर्व बातम्या खोट्या आहेत. पंतप्रधान नेतन्याहू हे ठीक आणि स्वस्थ आहेत, असा दावा इस्त्रायल सरकारकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
शुक्रवारी (13 मार्च) पंतप्रधान नेतन्याहू यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यांनी एक्स अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत सध्या सुरू असलेल्या युद्धावर प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे नेतन्याहू यांची हत्या झाल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
दुसरीकडे एआय जनरेटेड व्हिडीओमध्ये नेतन्याहू हे एका पत्रकार परिषदेला जात असल्याचं दिसत होतं. तर या पत्रकार परिषदेत नेतन्याहू यांनी हात उंचावल्यावर त्यांच्या हाताला सहा बोटे दिसत होती. त्यामुळे हा व्हिडीओ एआय जनरेडेट असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, एकिकडे न्यातनाहू यांच्या हत्येच्या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्ट झालं असून आता दुसरीकडे इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई जिवंत आहेत की नाही? असा सवाल डोनाल्ड ट्रम्प यांनी उपस्थित केला आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, सार्वजनिकरित्या मोजतबा खामेनेई एकदाही कुठे दिसले नाहीत. त्यांची इराणच्या सर्वोच्च पदी निवड करण्यात आल्यानंतर त्यांचा पहिला संदेश जाहीरपणे न देता लेखी स्वरूपात देण्यात आला होता. त्यामुळे ते जिवंत आहेत की नाही, हे माहिती नाहीये, असं ट्र्म्प म्हणाले.
मोजतबा खामेनेई जिंवत असल्याचा कुठलाही पुरावा नाहीये. तसेच मी असं ऐकलं आहे की खामेनेई जिवंत नाहीयेत. पण जर ते जिवंत असतील तर त्यांनी आपल्या देशासाठी पुढे येऊन काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी आत्मसमर्पण केलं पाहिजे, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.





