Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुण्यात धक्कादायक प्रकार! २० मुलांना कोंडून अंगणवाडी सेविका माजी सरपंचाच्या बैठकीला..
Pune

पुण्यात धक्कादायक प्रकार! २० मुलांना कोंडून अंगणवाडी सेविका माजी सरपंचाच्या बैठकीला..

Anganwadi Children Lock Incident

पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अत्यंत बेजवाबदार कृत्यामुळे सध्या हिंजवडीत मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. हिंजवडी येथील अंगणवाडीमधील सेविका आणि मदतनीस यांनी तब्बल 20 लहान मुलांना कुलूप लावून अंगणवाडीत कोंडून ठेवल्याची बाब समोर आली आहे. याचा एक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष बाब म्हणजे अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीस या लहान मुलांना कोंडून स्वतः ग्रामपंचायतीच्या एका बैठकीसाठी निघून गेल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.

बुधवारी 26 नोव्हेंबर दुपारी 11 ते 12 च्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली. अंगणवाडीतील सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांना ग्रामपंचायतीतील माजी सरपंचाने बोलावलेल्या एका बैठकीला जायचे होते. त्यावेळी अंगणवाडीची वेळ सुरु होती. या अंगणवाडीतील मुलांची योग्य व्यवस्था न करता, त्यांनी मुलांना अंगणवाडीच्या खोलीत बंद केले. त्यांना बाहेरून कुलूप लावून त्या निघून गेल्या. साधारण तासभर ही लहान मुलं त्या खोलीत बंद होती. यावेळी भीतीपोटी आणि एकटेपणामुळे ते मोठमोठ्याने रडू लागले.

हेही वाचा – भाजप-शिवसेना संघर्ष पेटला, निलेश राणेंचं भाजप कार्यकत्याच्या स्टिंग ऑपरेशन, थेट प्रदेशाध्यावर आरोप

पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप

या घटनेचा व्हिडिओ आज समोर आला असून मुलांचा आक्रोश पाहून पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणी अंगणवाडीतील सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांना याबाबतचा खुलाचा मागवण्यात आला. तेव्हा त्यांनी माजी सरपंचांनी बैठकीला बोलावले म्हणून आम्ही कुलूप लावलं, असा बेजबाबदार उत्तर दिलं. हा प्रकार लक्षात येताच उपस्थितांनी तातडीने मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांना माहिती दिली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ सेविका आणि मदतनीस यांना बैठक सोडून अंगणवाडीचे कुलूप खोलण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानंतर या कर्मचाऱ्यांनी येऊन कुलूप उघडलं आणि मुलांना मोकळं केलं.


बेजवाबदार अंगणवाडी सेविकांमुळे मुलांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह?

दरम्यान लहान मुलांना अशा प्रकारे कोंडून ठेवणे हे त्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत धोकादायक होते. कारण कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या बचावाचा मार्ग नव्हता. हा सरकारी बाल विकास योजनांच्या नियमांचे उल्लंघन करणारा गंभीर प्रकार आहे. सध्या तरी याप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र या घटनेमुळे अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts