Rajnath Singh | एकिकडे अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध (War) सुरू आहे. या युद्धामुळे तिन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. एकिकेड मध्य पूर्वेत संघर्षाचे वातावरण असताना आता दुसरीकडे भारत (India) आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ (Khawaja Asif) यांनी भारताला धमकी दिली होती. जर भविष्यात संघर्ष पेटला तर भारताच्या सीमावर्ती भागावर किंवा मुंबई, दिल्लीपर्यंत पाकिस्तान मर्यादित राहणार नाही. आम्ही थेट मुंबई, दिल्लीसह कोलकत्यावरही हल्ला करू, अशी धमकी ख्वाजा आसिफ यांनी दिली होती. तर ख्वाजा आसिफ यांनी दिलेल्या या धमकीनंतर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) हे आक्रमक झाले आहेत.
हेही वाचा – पक्ष स्थापना दिनी नितीन गडकरींचा सूचक वार; म्हणाले, “कुणाला पंतप्रधान करण्यासाठी…”
राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला काय दिला गंभीर इशारा?
ख्वाजा आसिफ यांच्या धमकीला आता राजनाथ सिंह यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. जर पाकिस्तानने बंगालकडे नजर टाकली तर त्यांचे तुकडे होतील, असा गंभीर इशारा राजनाथ सिंह यांनी दिला आहे.
राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भडकाऊ वक्तव्य करायला नको होते. त्यांनी 55 वर्षांपूर्वी त्याचे परिणाम भोगले आहेत जेव्हा पाकिस्तानचे दोन भाग झाले होते. त्यामुळे जर त्यांनी बंगालवर नजर टाकण्याचा प्रयत्न केला तर यावेळी पाकिस्तानचे एवढे तुकडे होतील की हे फक्त देवालाच माहिती, असं राजनाथ सिंह यांनी आक्रमक होत म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते ख्वाजा आसिफ?
भारताने कसल्याही प्रकारचे साहस करू नये. जर त्यांनी काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पूर्वेतील सर्वात मोठ्या शहरावर कोलकत्तावर आम्ही मोठा हल्ला करू, असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानला जागतिक स्तरावर बदनाम करण्याचा प्लॅन भारताचा आहे. भारत सध्या फॉल्स फ्लॅग ऑपरेशनची तयारी करत आहे. तसेच भारत त्यांच्या नागरिकांच्या माध्यमातून पाकिस्तानच्या नागरिकांना आणि पाकिस्तानला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही ख्वाजा आसिफ यांनी केला आहे.












