Reel Star Arun Tupe Death | नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध रील स्टार (Reel Star) अरूण तुपे (Arun Tupe) याचं आज (10 मार्च) सकाळी निधन झालं आहे. आपल्या राहत्या घरी अरूण तुपे मृतावस्थेत आढळल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अरूणचा चाहता वर्ग मोठ्या संख्येत होता. तर अरूणच्या आकस्मिक निधनानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अरूण तुपे राहत्या घरी आढळला मृतावस्थेत
अरूण तुपे हा छत्रपती संभाजीनगरमध्ये बालाजी नगर येथील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर अरूणच्या नातेवाईकांनी त्याला जवळच्या रूग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, रूग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
सध्या अरूणचा मृतदेह घाटी येथील शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर शवविच्छेदनातून त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती समोर येत आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूणला अपस्मारचा (फिट) त्रास होता. तर अद्याप त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाहीये.
मृत्यूच्या काही तासांआधी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेली रील
अरूण तुपे हा लोकप्रिय रील स्टार म्हणून ओळखला जातो. इन्स्टाग्रामवर ‘कोण अरुण तुपे’ या नावानं त्याचं अकाऊंट असून त्याचे तब्बल 179K एवढे फॉलोअर्स आहेत. तो तरूणामंध्ये खूप फेमस होता. त्याने त्याच्या कॉमेडीने आणि अभिनय कौशल्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली होती. तर धक्कादायक बाब म्हणजे, मृत्यूच्या काही तासांआधीच अरूणने इन्स्टाग्रामवर एक रील पोस्ट केली होती आणि तो त्या रीलवरील कमेंट्सना रिप्लाय देखील देत होता. त्यानंतर अचानक झालेल्या त्याच्या मृत्यूमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.
View this post on Instagram
अरूण तुपे हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असायचा. तो विनोदी व्हिडीओंसोबतच सामाजिक विषयांवरही व्हिडीओ बनवायचा. त्याचा साधा आणि ग्रामीण ढंगातील अंदाज त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडायचा.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध रील स्टार प्रथमेश कदमचंही निधन झालं होतं. आजारपणामुळे प्रथमेशचं निधन झाल्याची माहिती समोर आली होती. प्रथमेशच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. प्रथमेशचे त्याच्या आईसोबतचे व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडायचे. आई आणि लेकाची ही जोडी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फेमस होती. प्रथमेश हा रील स्टार असण्याबरोबरच डान्सर देखील होता. तर प्रथमेशनंतर आता अरूणचंही निधन झाल्याने चाहत्यांना धक्का बसला असून सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.







