Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • रूपाली चाकणकर पुन्हा अडचणीत; रायगड कनेक्शनचा झाला खुलासा, नेमकं प्रकरण काय?
Top News

रूपाली चाकणकर पुन्हा अडचणीत; रायगड कनेक्शनचा झाला खुलासा, नेमकं प्रकरण काय?

Rupali Chakankar | नाशिकमधील (Nashik) भोंदू ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचेही नाव घेतले जात असून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भोंदूबाबा अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांच्या कुटुंबियांचे जवळचे संबंध होते. तर रूपाली चाकणकरांचे अशोक खरातसोबतचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे रूपाली चाकणकरांचा या प्रकरणात संबंध असल्याचं म्हटलं जात आहे. खरात प्रकरणामुळे रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर आता चाकणकरांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कारण त्यांचे आणखी एक नवे कनेक्शन उघड झाले आहे.

हेही वाचा – 7. अशोक खरातला पुन्हा झटका; 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढली, कोर्टात नेमकं काय घडलं?

नेमकं प्रकरण काय?

रूपाली चाकणकर यांचे रायगडमधील व्यावसायिक संबंध आता उघडकीस आले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारेंनी रूपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले असून हे आरोप खरे ठरताना दिसत आहेत. सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या रायगडमधील रोहा येथे आकाश चौधरी आणि निलेश चाकणकर बांधकाम व्यावसायात भागीदार असल्याचा खुलासा झाला आहे.

निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी यांनी कर्मा कनस्ट्रक्शन LLP च्या माध्यमातून रोह्यातील रोठ खुर्द येथे एक बहुमजली इमारत उभी केली होती. तर याबाबत भाजपचे अल्पसंख्यांक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी खळबळजनक दावा केला होता. कर्मा कनस्ट्रक्शन LLP च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बहुमजली उमारतीचे बांधकाम हे नियमबाह्य आणि अनधिकृत आहे, असा दावा सय्यद यांनी केला आहे. याप्रकरणी सय्यद यांनी माणगाव न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे. त्यामुळे आता निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे अडचणीत आले आहेत.

दुसरीकडे शिवानिका ट्र्स्टच्या व्यवहाराप्रकरणी विशेष तपास पथकाकडून (SIT) रूपाली चाकणकरांची चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एसआयटीने अशोक खरातशी संबंधित शिवानिका या संस्थेचा तपास करण्यास सुरूवात केली आहे. या संस्थेच्या सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी एसआयटी करत आहे. त्यामुळे आता रूपाली चाकणकर यांच्यासोबत आजी-माजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणामुळे रूपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. राजकीय वर्तुळातून रूपाली चाकणकरांवर गंभीर आरोप केले जात आहेत. यापार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता चाकणकरांविरोधात गुलाबो गँगकडून आंदोलन केले जाणार आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts