Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकु राजगुरु ने केली कमाल, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क..
Top News

‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकु राजगुरु ने केली कमाल, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क..

Rinku Rajguru and Ashish Patil dance

Rinku Rajguru viral video : ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सौराट चित्रपटातील आपल्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी रिंकु कायम सिनेमा आणि मराठमोळ्या लूकमध्ये चर्चेत असणारी रिंकू आता खास कारणामुळे चर्चेत आली आहे. उत्तम अभिनय आणि डायलॉग बोलणाऱ्या रिंकू आता भन्नाट डान्स देखील करत आहे. सध्या रिंकू हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रिंकू डान्स करताना दिसत आहे. खुद्द रिंकू हिने डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रिंकू हिची चर्चा

व्हिडीओ पोस्ट करत रिंकू हिने सुरुवातीला गाण्याच्या काही ओळी कॅप्शनमध्ये लिहिल्या आहेत. ‘बस गया है कोई इस दिल में कहें या ना कहें…’ पुढे रिंकू म्हणाली, ‘माझी एक अनपेक्षित बाजू शेअर करत आहे. अगदी शेवटच्या क्षणी 2 तास सराव आणि शूटिंग करण्यासाठी आशिष पाटील तुझे खूप आभार.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रिंकू हिची चर्चा सुरु आहे.

हेही वाचा – यंदा मेक्सिकोची फातिमा बॉश ठरली मिस युनिवर्स; चाहत्यांची सोशल मिडियावर प्रतिक्रिया

‘निगाहें मिलाने को जी चाहता है’

रिंकू हिने 22 नोव्हेंबर रोजी ‘निगाहें मिलाने को जी चाहता है’ या सदाबहार गाण्यावर एक व्हिडिओ शेअर केला. तिने नृत्यदिग्दर्शक आशिष पाटीलसह हा परफॉर्मन्स सादर केला आहे. रिंकू हिचा भन्नाट डान्स, चेहऱ्यावरील हावभाव चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. जवळपास 62 वर्ष जुन्या गाण्यावर रिंकू-आशिषने त्यांची नृत्यकला सादर केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त 2 तास सराव करुन रिंकू हिने आशिष याच्यासोबत व्हिडीओ शूट केला आहे.

रिंकू हिच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव

अनेकांनी रिंकू हिच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे. एक नेटकर कमेंट करत म्हणाला, ‘मराठी मुलीची वेगळी स्टाईल… बॉलिवूडवालो मराठी मुलगी येतेय…’, दुसरा एक नेटकरी म्हणाला, ‘रिंकूला असे पाहून आनंदाश्चर्य वाटले, खूप छान.. मेहनत जाणवते.’

‘सैराट’ सिनेमातून एका रात्रीत स्टार

रिंकू हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘सैराट’ सिनेमातून एका रात्रीत स्टार झाल्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अभिनेत्रीने पदार्पण केलं आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts