Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • T20 विश्वचषकात संजू सॅमसनचा जलवा; बनला T20 विश्वचषकाचा नवा सिक्सर किंग
Top News

T20 विश्वचषकात संजू सॅमसनचा जलवा; बनला T20 विश्वचषकाचा नवा सिक्सर किंग

Sanju Samson | 2026 च्या टी-20 विश्वचषकात (T-20 World Cup 2026) भारतीय संघानं (Team India) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडवर मात करत भारतीय संघानं तिसऱ्यांदा विजेपदक पटकावले आहे. अहमदाबादमधील (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) हा सामना पार पडला. भारतीय संघ आणि न्यूझीलंडमध्ये (IND vs NZ) चुरशीचा सामना रंगला होता. या सामन्यात भारतीय संघानं न्यूझीलंडवर मात करत दमदार असा विजय मिळवला आहे. 96 धावांनी मात करत भारतीय संघांनं टी-20 विश्वचषक विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. तर या सामन्यात फलंदाज संजू सॅमसने (Sanju Samson) नवा विक्रम रचला आहे.

हेही वाचा – टीम इंडियाचा विश्वविजय! न्यूझीलंडवर मात करत T20 विश्वचषक जिंकून रचला इतिहास

संजू सॅमसन ठरला विश्वचषकाचा नवा सिक्सर किंग

संजू सॅमसनने अंतिम सामन्यात दमदार अशी खेळी खेळली. त्याने सर्वाधिक धावा करत टी-20 विश्वचषक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने 46 चेंडूत 89 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने पाच चौकार आणि आठ षटकार मारत मोठा विक्रम रचला आहे. तो आता विश्वचषकाचा नवा सिक्सर किंग ठरला आहे.

2026 च्या टी-20 विश्वचषकात संजू सॅमसनने एकूण 24 षटकार मारले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याने या स्पर्धेच्या एकाच आवृत्तीमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा नवा विक्रम रचला आहे. याआधी टी-20 विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक षटकार विक्रम निकोलस पूरनने मारत विक्रम रचला होता. पूरनने 2024 मध्ये 17 षटकार मारले होते. तर आता विक्रम निकोलस पूरनलाही मागे टाकत संजू सॅमसनने एकन नवीन स्थान मिळवत विक्रम रचला आहे.

टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधित षटकार मारणारे फलंदाज कोणते?

1. संजू सॅमसन – 24 (2026)
2. फिन एॅलन – 20 (2026)
3. शिमरॉन हेटमायर – 19 (2026)
4. इशान किशन – 18 (2026)
5. साहिबजादा फरहान – 18 (2026)
6. शिवम दुबे – 17 (2026)
7. निकोलस पूरन – 17 (2024)

दरम्यान, न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. तर भारतीय संघानेही हे आव्हान स्विकारत भारताच्या संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी शानदार अशी सुरूवात केली. त्यांनी 98 धावा करत शानदार अशी कामगिरी केली. अभिषेकने 21 चेंडूंमध्ये 52 धावा केल्या तर संजू सॅमसनने 46 चेंडूंमध्ये 89 धावा केल्या. या दोघांसोबत इशान किशनने देखील धमाकेदार अशी खेळी केली. त्याने 25 चेंडूत 54 धावा करत अर्धशतक ठोकले. तर यावेळी सूर्यकुमार यादव चांगलीच कामगिरी करू शकला नाही. हार्दिक पांड्यानेही 13 चेंडूंमध्ये 18 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर न्यूझीलंडच्या जेम्स नीशमने तीन विकेट घेतल्या.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts