Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अंबाबाईचा साज, निरागस हास्य! साताऱ्याच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून सगळे म्हणाले ही तर…
Top News

अंबाबाईचा साज, निरागस हास्य! साताऱ्याच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून सगळे म्हणाले ही तर…

Satara Litter girl viral video

Satara Child Video: साताऱ्यातील ३ महिन्याच्या चिमुकलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

साताऱ्याची गोड चिमुकली अंबाबाईच्या रूपात दिसून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिचं निरागस हसू आणि गोड भाव पाहून प्रत्येक जण म्हणतो – “ही तर साक्षात देवीच आहे. लहान मुलांच्या निरागसतेत एक वेगळंच आकर्षण असतं. त्यांच्या हसण्यात आणि निरागस भावांमध्ये काहीतरी इतकं पवित्र असतं की ते पाहताना मन प्रसन्न होतं.

हेही वाचा: Daily Horoscope: आज १८ मार्च! मेष, मिथुनसह ‘या’ राशींनी राहावे सावध; वाचा तुमचं राशिभविष्य

साताऱ्याची चिमुकली सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. अवघ्या काही महिन्यांची ही मुलगी, देवीच्या वेशात इतकी सुंदर दिसते की पाहणाऱ्यांना क्षणभर थक्क व्हायला होतं. यात पारंपरिक दागिने, सुंदर साज आणि चेहऱ्यावरचे निरागस भाव यामुळे तिचं रूप अधिकच खुलून आलं आहे. कॅमेऱ्यासमोर तिने दिलेल्या नैसर्गिक आणि गोंडस प्रतिक्रिया पाहून अनेकांनी तिची तुलना देवीशी केली आहे.

ही चिमुकली साताऱ्यातील असून, एका फोटोशूटदरम्यान तिचा हा खास अंदाज टिपण्यात आला. त्यानंतर तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच तो झपाट्याने व्हायरल झाला. व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू येत आहे. अनेक जण तिच्या निरागसतेवर आणि गोडवावर फिदा झाले असून कमेंट्समध्ये तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

आजच्या धकाधकीच्या जीवनात असा एखादा गोड क्षण पाहायला मिळणं म्हणजे जणू मनाला मिळालेला एक छोटासा आनंदच म्हणावा लागेल.

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts