Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • शीतल तेजवानीला बेड्या, राजकीय नेत्यांच्या मुलांना पायघड्या
Top News

शीतल तेजवानीला बेड्या, राजकीय नेत्यांच्या मुलांना पायघड्या

Parth pawar and sheetal tejwani

Koregaon-Mundhwa land deal scam : पुण्यातील कोरेगाव-मुंढवा येथील ४० एकर कथित जमीन व्यवहार घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांनी अटक केली. जमीन विक्री करणाऱ्या तेजवानी अटक केली खरी पण आता यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ज्या शीतल तेजवानीने अमेडीया कंपनीला जमीन विकली ज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांची ९९ टक्के भागीदारी आहे तर दिग्वीजय पाटील याची १ टक्का भागीदारी आहे. विक्री करणाऱ्या शीतल तेजवानी वर पोलिसांनी कारवाई केली खरी मग खरेदी करणाऱ्या अमेडीया कंपनी आणि तिच्या भागीदारांवर कारवाई का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शीतल तेजवानीला बेड्या आणि राजकीय नेत्यांच्या मुलांना पायघड्या का घातल्या जात आहेत? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा – तब्बल वीस वर्षांनंतर राज ठाकरे यांनी घेतली संजय राऊतांच्या घरी जाऊन भेट

पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी झाला का? – अंबादाज दानवे

पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला ‘अखेर’ अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही? पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस ‘मुदतवाढ-मुदतवाढ’ खेळणार आहात? अमेडिया कंपनीत केवळ १ टक्का भागधारक दिग्विजय हा ९९ टक्के भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी झाला का? मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सरकार कधी जाहीर करणार? ही शुल्क माफी राजकीय दबावाशिवाय होणे शक्य नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची कल्पना नाही असे सांगणे, हे जनतेला शुद्ध वेडे बनवणे आहे. ते ही बहुमताच्या जोरावर, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

दिग्वीजय पाटील, शीतल मेजवानी आणि रविंद्र तारु यांच्या विरोधात गुन्हा

जमीन घोटाळा प्रकरणातील दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी शीतल तेजवानीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी देखील झाली. माझ्यावर दाखल झालेला एफआयआर मीडिया रिपोर्टनुसार गुन्हा दाखल केला असून मीडियात फरार घोषित करण्यात आल्याचा आरोप तेजावणी यांनी याचिकेत केला होता. दरम्यान अन्य एका जमिनी खरेदी प्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून तेजवानीची उपस्थिती आवश्यक असल्याचा युक्तिवाद देखील वकिलांनी केला होता. कोरेगाव पार्क मुंढवा जमीन गैरव्यवहाराबद्दल आधी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बावधन पोलीस ठाण्यात दिग्वीजय पाटील, शीतल मेजवानी आणि रविंद्र तारु यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी तपासाला गती देण्यासाठी शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यासंदर्भात आवाज उठवला होता. त्यांनी पुणे पोलिसांसह, चौकशी समितीकडे सर्व पुरावे सादर केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली होती. आता या प्रकरणाच्या तपासातून नेमके काय बाहेर येते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. कोरेगाव पार्क – मुंढवा येथील १८०० कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ ३०० कोटींमध्ये घेतली. यासाठी स्टँप ड्युटी म्हणून ५०० रूपये मोजल्याचा आरोप करण्यात आला होता.

अमेडीया कंपनीने कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही केली होती. व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने ४८ तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ २७ दिवसांत हा व्यवहार झाला होता. हे प्रकरण माध्यमांमध्ये आल्यानंतर संबंधित व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी दिली होती.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts