मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ जिल्हाप्रमुख मंगेश चिवटे यांच्यावर आज सकाळच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
करमाळा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर सकाळच्या सुमारास हल्ला झाल्याची घटना घडली आहे. ते सकाळच्या सुमारास करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे शेतात गेले होते. त्याचवेळी हा हल्ला झाला. मंगेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक यांचे जेष्ठ बंधू असल्याची माहिती मिळाली आहे. हा हल्ला झाल्यानंतर पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली.
हे ही वाचा : मोठी बातमी ! स्वर्गीय बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस घरात…, शिंदे गटाचे खळबळजनक वक्तव्य
हल्ला प्रकरणी नेत्यांवर संशय
या हल्ल्यानंतर महेश चिवटे यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी हल्ल्याबद्दल बोलताना दोन नेत्यांचे नाव घेतले आहे. हा हल्ला करण्यासाठी दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांनी सुपारी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. दिग्विजय बागल हे विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवार म्हणून उभे राहिले होते. तसेच त्यांच्या भगिनी रश्मी बागल या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहे. या प्रकरणावरुन सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा समोर येत आहे.
काय आहे प्रकरण
मिळलेल्या माहिती नुसार, करमाळा येथे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांचे बंधू आहेत. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले होते. जिल्हाप्रमुख महेश चिमटे आणि दिग्विजय बागल यांच्यातील वाद कमी होण्याऐवजी वाढत चालल्याचे उघड झालेय. आता या वादाचे रूपांतर हल्ल्यात झाल्आयाचा संशय व्हेयक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.