Sikandar Shaikh | महाराष्ट्राचा (Maharashtra) प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेखने (Sikandar Shaikh) ) दमदार अशी कामगिरी केली आहे. महाराष्ट्र केसरीची (Maharashtra Kesari) गदा उचलणाऱ्या सिकंदर शेखने पुन्हा एकदा आखाड्यात धुरळा केला आहे. सिकंदरने दोन मिनिटांमध्ये दोन लाखांची कुस्ती जिंकत मोठा पराक्रम केला आहे. त्यामुळे सध्या सिकंदर शेख चांगलाच चर्चेत आहेत. तसेच त्याचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
हेही वाचा – उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 4 नगरसेवकांनी सोडली साथ, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश
सिकंदरने दोन मिनिटात दोन लाखाचं बक्षिस जिंकलं
दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथे 1967 साली झालेले हिंदकेसरी पैलवान हजरत पटेल यांच्या स्मरणार्थ कुस्त्यांचा सामना भरवण्यात आला होता. हा सामना जिंकणाऱ्या पैलवानाला दोन लाखांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं.
सिकंदर शेखने कोणत्या पैलवानाला केले चितपट?
या सामन्यातील मुख्य लढत ही महाराष्ट्राचा सिकंदर शेख आणि हरियाणाचा अजय बनवाला यांच्यात झाली. ही मुख्य लढत 2 लाख रूपयांसाठी होती. तर या चुरशीच्या सामन्यात सिकंदर शेखने आपली चतुरता आणि चपळाई दाखवत अजय बनवालाला अवघ्या दोन मिनिटात चितपट केले आणि दोन लाखाचे बक्षिस जिंकले. सिकंदरच्या या दमदार कामगिरीनंतर कुस्तीप्रेमींनी मोठा जल्लोष केला.
सिकंदर शेखचा दबदबा सोलापूरच्या लाल मातीत देखील पहायला मिळाला.या सामन्यादरम्यान कुस्तीप्रेमींनी सिकंदर शेखला मोठा सपोर्ट केला होता. त्यामुळे कुस्तीप्रेमींनी केलेल्या सपोर्टमुळे सिकंदरला मोठं बळ मिळालं आणि त्याने दमदार असा विजय मिळवला. डोळ्याची पापणी लवते ना लवत तोच सिकंदरने अजयला चितपट करत पोरितोषक आपल्या नावी केले, त्यामुळे सिकंदरचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.
सिकंदर आणि अजय यांच्यानंतर दुसरा मोठा सामना झाला तो पंजाबचा जसप्रत सिंग आणि नेपाळचा देवा थापा यांच्यात. या सामन्यात देवा थापाने आपली ताकद दाखवत पंजबाच्या जसप्रतचा पराभव केला आणि दीड लाख रूपयाचा इनाम आपल्या नावे केला.
या कुस्ती सामन्यात 1 लाख आणि दीड लाखाच्या इनामाच्या अनेक महत्त्वाच्या कुस्ती स्पर्धा लावण्यात आल्या होत्या. तर या सामन्यांमध्ये पैलवान सिकंदर शेख, सर्जेराव काळे, नवीलाल दिवाने, शाहरूख खान, संतोष मोची, विजय वारा, मशीद शेख आणि जीवन भुजबळ यांसारख्या अनेक मोठ्या पैलवानांनी सहभाग घेतला होता. तर सर्व मल्लांनी दमदार अशी कामगिरी करत पारितोषिकावर आपले नाव कोरले आहे.









