Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • नालंदा येथील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी; 8 भाविकांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख
Top News

नालंदा येथील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी; 8 भाविकांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख

Bihar News | बिहारमध्ये (Bihar) मोठी दुर्घटना घडली आहे. बिहारमधील नालंदा (Nalanda) येथील शीतला मंदिरात (Sheetla Temple) मोठा अपघात घडला. शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली. तर या घटनेत 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनं बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! अश्विनी भिडे मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त, मुंबईची कमान महिला नेतृत्वाच्या हाती

शीतला मंदिरात चेंगराचेंगरी, 8 भाविकांचा मृत्यू

नालंदा जिल्ह्यातील दिपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माघरा गावातील शीतला मंदिरामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर पूजेदरम्यान भाविकांची गर्दी अनियंत्रित झाली आणि मोठी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आठ भाविकांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. तर या घटनेची माहिती मिळतात दीपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले होते. तर पोलिसांनी जखमींना रूग्णालयात दाखल केलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दु:ख व्यक्त करत मदत जाहीर केली आहे. नितीश कुमार यांनी या घटनेबाबत चौकशी करण्यासाठी मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत. तर मृताच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी 2 लाख रूपये देण्याचे जाहीर केले आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येकी 4 लाख रूपये मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. “बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील अपघाताबाबत अत्यंत दु:ख आहे. ज्या कुटुंबियांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती मी माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो. तसेत जखमी लोकं लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तर पीएमएनआरएफमधून प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 50,000 रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, शीतला मंदिरात झालेल्या या अपघातामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तर पोलीस सध्या या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.

 

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts