Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • एका ट्विटने बाजार हादरला! होर्मुज सामुद्रधुनीतून टँकर बाहेर? अमेरिकन मंत्र्यांच्या ट्विटनंतर कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
Top News

एका ट्विटने बाजार हादरला! होर्मुज सामुद्रधुनीतून टँकर बाहेर? अमेरिकन मंत्र्यांच्या ट्विटनंतर कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण

Hormuz Strait Oil Tanker | इस्त्रायल (Israel), अमेरिका (US) आणि इराण (Iran) या देशांमधील युद्ध (War) चांगलंच पेटताना दिसत आहे. हे युद्ध थांबण्याच्या मार्गावर असताना पुन्हा एकदा पेटले आहे. या युद्धामुळे अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. कारण या युद्धाच्या भडक्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. गॅस, तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून अनेक देशांना मोठा धक्का बसला आहे. अशातच अमेरिकेच्या एका ट्विटने जागतिक बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – तणाव शिगेला! अमेरिकेची इराणला मोठी धमकी, म्हणाले, आम्ही तुमच्यावर 20 पटीने…

अमेरिकेने एक ट्विट केले आहे ज्यामध्ये होर्मुजच्या सामुद्रधुतीतून एक तेलाचा टँकर (Hormuz Strait Oil Tanker) यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाल्याचा दावाही या ट्विटमध्ये करण्यात आला आहे.

अमेरिकेने नेमकं काय ट्विट केलं?

होर्मुजच्या सामुद्रधुतीतून तेलाच्या टँकरबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील ऊर्जा मंत्री क्रिस राइट यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, होर्मुजच्या सामुद्रधुतीतून अमेरिकेच्या नौदलाने एक तेलाचा टँकर सुरक्षितपणे बाहेर काढला आहे, असा दावा क्रिस राइट यांनी केला होता. तर त्यांच्या पोस्टनंतर जागतिक बाजारात सकारात्मक संकेत जात ब्रेंट क्रूडचे दर 120 डॉलरवरून 80 डॉलपर्यंत खाली कोसळले. पण चकीत करणारी गोष्ट म्हणजे, काही वेळातच अमेरिकेकडून करण्यात आलेली ही पोस्ट डिलिट करण्यात आली.

अमेरिकेकडून पोस्ट डिलिट करण्यात आल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिव लेविट यांनी सांगितलं की, सध्या अमेरिकच्या नौदलाने होर्मुजच्या सामुद्रधुतीतून कोणत्याही टँकरला बाहेर काढलेले नाही. तसेच ऊर्जा मंत्रालयाने केलेली पोस्ट ही एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे झाली होती, असं म्हणत कॅरोलिव लेविट यांनी माफी मागितली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने इराणला इशाला दिला होता. जर इराणने होर्मुझ मार्ग बंद केला तर आम्ही त्यांच्यावर घातक हल्ले करू, असा इशारा अमेरिकेने दिला होता. तर आताही अमेरिकेने इराणला मोठी धमकी दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथसोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, जर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाचा प्रवाह विस्कळीत करण्यासाठी काही हालचाल केली तर आम्ही इराणवर 20 पटीने हल्ले वाढवू, अशी थेट धमकी ट्रम्प यांनी इराणला दिली आहे. त्यामुळे आता हे युद्ध आणखी पेटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts