Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • ‘त्या’ जबरदस्त कॅचने मॅच पलटवणारे, ‘बापू’ तेव्हाही इंग्रजांना भारी पडले अन् आत्ताही
Top News

‘त्या’ जबरदस्त कॅचने मॅच पलटवणारे, ‘बापू’ तेव्हाही इंग्रजांना भारी पडले अन् आत्ताही

Axar Patel

India vs England Semi-Final : भारत विरुद्ध इंग्लंड सेमिफायनल सामना हा केवळ मॅच नाही तर अबसूलेट सिनेमाच होता. ज्यात ड्रामा होता, ज्यात थ्रिलर होतं, ज्यात पॉवर पॅक अॅक्शन बघायला मिळालं. या सामन्यानंतर सर्वात जास्त चर्चा होतेय, ती म्हणजे बापूची… बापू म्हणजे कोण? तर बापू म्हणजे महात्मा गांधींची चर्चा नाही होतंय…तर बापू म्हणून चर्चा होतेय, ती आपला नवा बापू अक्षर पटेलची… भारतासाठी बेथल आणि जॅक्स जोडी घातक ठरत होती, तेव्हा सीमारेषेवर अक्षर पटेलने जेव्हा जॅक्सची कॅच पकडली, तेव्हाच मॅच पलटली. अक्षय पटेलच्या कॅचची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. उत्कृष्ठ फिल्डिंग आणि गोलंदाजीने त्याने टीम इंडियाला कठीण परिस्थितीतून वाचवलं अन् भारतीय संघाने फायनल सामन्यात मजल मारली.

हेही वाचा – टीम इंडियाची फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री, थरारक सामन्यात इंग्लंडचा 7 धावांनी पराभव

आता तुम्ही म्हणाल कालच्या मॅचमध्ये संजूनं ताबडतोड बॅटिंग केली. हार्दिकचा स्वॅग दिसला. तिलकचा स्पार्क दिसला. मग चर्चा अक्सरची का? अरे भाई. जहा मॅटर बडा होता है. वहा अपना अक्सर खडा होता है. भारतानं सुरूवातीला बॅटिंग करतना षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडत गोऱ्यांसमोर तब्बल 253 धावांचा डोंगर उभा केला. आता एवढ्या धावा झाल्यावर वाटत होतं भारत हा सामना आरामात जिंकेल. पण मॅच वानखेडेत असेल. आणि ड्रामा नाही होणार तर. तो सामना कसला. इंग्लंडची बॅटिंग सुरू झाली आणि बेथमची फटकेबाजी बघून क्रिकेट रसिकांना घाम फुटला. वाटलं. फिर लूट लिया अंग्रेजोने हमे. पण जेव्हा विषय गोऱ्यांचा येतो, तेव्हा अक्सर खुट्टा ठोकून वाटेत बसलेला असतो.

अक्षर पटेलनं मागे उलटं पळत जो कॅच पकडला

अगदी स्वतंत्र संग्रामापासून ते कालच्या मॅचपर्यंत तेच दिसून आलं. कारण मॅच धोक्यात असताना अक्षर पटेलनं मागे उलटं पळत जो कॅच पकडला त्यानं इंग्लंडला संकटात आणलं, मात्र तरीही बेथम आणि सॅम करनची फटकेबाजी सुरूच होती, तरीही वाटत होतं, एवढं करूनही मॅच जाते की काय? पण बापू म्हणजे अक्षर पटेल इंग्लंडला पुन्हा नडला आणि शिवम दुबेसोबत मिळून त्यांना बॉन्ड्रीवर असा काही कॅच पकडला की सामना तिथेच फिरला. बापूनं फक्त कॅच नाही तर गेलेली मॅचच पकडली होती. अशक्य वाटणारा कॅच बापूनं अत्यंत सावधगिरीनं पकडला, त्याचा तोल बाहेर जातोय हे कळताच जवळ आलेल्या दुबेकडे तो बॉल फेकला आणि बापू बॉन्ड्रीच्या बाहेर कोसळला. पण इकडे इंग्लंडची बॅटिंग लायनपही या कॅचनं कोसळली. त्यामुळे पुढचा कार्यक्रम जरा सोप्पा झाला.

ओव्हर बुमराहला दिली आणि मॅच फिरली

मग काय सुर्यानं आपला ठरलेला एक्का काढला, ओव्हर बुमराहला दिली आणि मॅच फिरली. कारण जशीने या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा दिल्या आणि इंग्लंडचे पाय बांधले. त्यामुळे शेवटीच्या दोन ओव्हरमध्ये ३९ धावा उरल्या आणि उरलेला कार्यक्रम हार्दिक पांड्या. अर्शदीप सिंग आणि शिवम दुबेनं उरकला. इंग्लंडनं तरीही 246 धावांपर्यंत मजल मारली. पण निकाल भारताच्या बाजूनं आला भारतानं ही मॅच 7 धावांनी जिंकली त्यानंतर सोशल मीडियावर बापूचा स्वॅग पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर अक्षर पटेल सध्या ट्रेंडिंगवर आहे.

संजू सॅमसननं आणि इशान किशाननं सामना सावरला

सामन्याच्या सुरूवातीलाच अभिषक शर्मा पुन्हा नेहमीप्रमाणे स्वस्तात बाद झाल्यानंतर संजू सॅमसननं आणि इशान किशाननं सामना सावरला, जोरदार फटकेबाजी सुरू करत बोर्डवरच्या धावा कमी होऊ दिल्या नाहीत. त्यानंतर शिवब दुबे आणि हार्दिक पांड्यानं तोच जोर कायम ठेवत धावा चोपत राहिले. त्यानंतर शेवटी तिलक वर्मानं उरली सुरूली कसर पुरी करत धावा चोपल्या. त्यामुळे भारताला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली, काल वानखेडेच्या मैदानात टी-20 मध्ये 500 हून अधिक धावा दोन्ही डावांत मिळून झाल्या, त्यामुळे भारतानं केलेल्या 253 धावाही इंग्लंडच्या बॅटिंगसमोर कमी वाटत होत्या. तसेही वानखेडे मैदान बॅटिंगसाठी नंदनवनच आहे. त्यामुळे धावांचा पाऊस पडत होता, हे मॉडर्न क्रिकेट आहे, बॉस इथे धावांचा पाऊस फक्त पाऊस पडत तर अतिवृष्टी होते. त्या अतिवृष्टीत एक संघ वाहून जातो, एक संघ पुढे जातो.

भारताला फायनलचं तिकीट मिळालंय

कालच्या मॅचनंतर इंग्लंड बाहेर गेलीय, तर भारताला फायनलचं तिकीट मिळालंय, दुसरीकडे फायरब्रांड दक्षिण आफ्रिकेला हरवून न्यूझीलंड फायनलमध्ये धडकलीय. त्यामुळे हा सामनाही सोप्पा नसणार आहे, हे फायनल आहे. या दोन बेस्ट विरुद्ध बेस्ट अशा टीम भिडणार आहे, पण या फायनलचा व्हेन्यू बघितल्या प्रत्येक क्रिकेट चाहत्यांच्या मानावर थोडं दडपन येतं, कारण टीम इंडियासाही हे मैदान कायम अपयशी राहिलेलं आहे, त्यात 2023 च्या वर्ल्डकप फायनलच्या कटु आठवणीही सामील आहेत. एवढं नाही तर भारतानं मागचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामनाही याच मैदानात गमावला होता, त्यामुळे इथं जरा जपून खेळावं लागणार आहे. बाकी हा सामना आणि इंग्रज विरुद्ध बापू. या सामन्यानं एकच दाखवून दिलंय की बापू तेव्हाही इंग्रजांना भारी पडले अन् बापू आजही इंग्रजांचा भारीच पडले. बापू थारा खेल कमाल छे…धमाल छे…बवाल छे… अशा मिम्स आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts