Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • अजित पवारांच्या अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती समोर; व्ही के सिंगने CID ला सांगितले खरे सत्य, म्हणाला, “त्या चुकीमुळे…”
Top News

अजित पवारांच्या अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती समोर; व्ही के सिंगने CID ला सांगितले खरे सत्य, म्हणाला, “त्या चुकीमुळे…”

Ajit Pawar Plane Crash | राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताला (Plane Crash) आता महिना होऊन गेला असून या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे. अजित पवारांचा खरचं अपघात होता की घातपात होता? अशा शंका गेल्या काही दिवसांपासून व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. सीआयडीकडून (CID) या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या तपासादरम्यान आता अजित पवारांच्या विमान अपघातातबाबत (Ajit Pawar Plane Crash) धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – मालेगावच्या शिरपेचात मानात तुरा, युपीएससी परीक्षेत शेतकऱ्याच्या लेकीला घवघवीत यश

व्हीएआर (VSR) कंपनीचे मालक व्ही.के.सिंग (V.K.Singh) यांनी सीआयडीला धक्कादायक माहिती दिली आहे. पायलट सुमित कपूर यांच्या चूकीमुळे हा अपघात झाला असल्याची, मोठी माहिती व्ही.के.सिंग यांनी दिली आहे. त्यामुळे या तपासाला आता नवीन वळण मिळाले आहे.

व्हीएआर (VSR) कंपनीच्या मालकानं नेमका काय दावा केला?

गेल्या तीन दिवसांपासून सीआयडीच्या पथकाकडून व्हीएसआर (VSR) कंपनीचे मालक व्ही.के.सिंग यांची चौकशी केली जात आहे. या चौकशीदरम्यान व्ही.के.सिंग यांनी अपघातावेळी कोणाची चूक होती आणि हा अपघात कसा घडला याबाबत खुलासा केला. वैमानिक सुमित कपूर यांच्याकडून झालेल्या चुकीमुळे विमानाचा भीषण अपघात घडला असावा, असा खळबळजनक दावा व्ही.के.सिंग यांनी आपल्या जबाबात केला आहे.

तसेच या अपघात प्रकरणात माझी जर चूक असेल, तसेच कंपनीकडून काही त्रुटी राहिल्या असतील तर मला कठोर शिक्षा करा, असं वक्तव्य व्ही.के.सिंग यांनी केले आहे. तसेच त्यांनी सीआयडीच्या तपासात सहकार्य करण्याची पूर्ण तयारी देखील दर्शवली आहे.

सीआयडीकडून विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील संभाषणाची पुन्हा एकदा पडताळणी

दरम्यान, व्ही.के.सिंग यांनी केलेल्या दाव्यानंतर पायलट सुमित कपूर यांच्यावर आणि त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच सीआयडीकडून आता विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील संभाषणाची पुन्हा एकदा पडताळणी केली जात आहे.

तर काल, अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला. समोर आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, अजित पवारांच्या विमान अपघातादरम्यान बारामती विमातळाच्या परिसरात दाट धुके होते. तसेच एअर ट्रॅफिक कंट्रोलरने (ATC) दृश्यमानता 3 किमी असल्याचं कळवलं होतं, मात्र तरीही लँडिंगचा पहिला प्रयत्न सफल ठरला नाही. त्यानंतर धावपट्टी दिसल्याचा अहवाल दिल्यानंतर पायलटने दुसऱ्यांदा लँडिंगसाठी प्रयत्न केला. पण, काही क्षणांतच विमानाचा ताबा सुटला आणि अपघात झाला, असं अहवालातून स्पष्ट झाले आहे.

अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणानुसार, विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी उजव्या बाजूला झुकले होते. तर विमानाचा संपर्क तुटण्यापूर्वी पायलटने “Oh Shitt…” असे उद्गार काढल्याचं रेकॉर्ड झाले आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts