Shrikant Shinde | सध्या राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) वरून मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. ठाकरे गटाचे (Thackeray Group) 8 खासदार एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटात जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच या खासदारांची शिंदे गटासोबत (Shinde Group) गुप्त बैठक झाली असल्याचंही म्हटलं जात आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता ‘ऑपरेशन टायगर’वर खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – “आम्ही विकली जाणारी औलाद नाही…”, ‘ऑपरेशन टायगर’वरून अरविंद सावंत आक्रमक, शिंदे सेनेवर केला हल्लाबोल
ठाकरेंचे खासदार शिंदे गटात जाणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ठाण्यात एक गुप्त बैठक झाली होती. या बैठकीला ठाकरे गटाचे 8 खासदार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. यामध्ये ठाकरे गटाचे संजय दिना पाटील, संजय जाधव, राजाराम वाकचौरे, राजाभाऊ वाजे, नागेश पाटील आष्टीकर आणि अरविंद सावंत हे खासदार या बैठकीला उपस्थि असल्याचं म्हटलं जात होतं. तर या सर्व खासदारांसोबत एकनाथ शिंदेंनी संवाद साधला असून त्यांना केंद्रात महत्त्वाची पदे मिळतील, असं आश्वासन देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
नेमकं काय म्हणाले श्रीकांत शिंदे?
आता या सर्व घडामोडींवर एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट उत्तर दिलं आहे. “या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाहीये. ऑपरेशन टायगरबाबत गेल्या वर्षभरापासून अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. ही बातमी एक प्रकारची अफवा आहे. आमच्या पक्षाची कोणतीही गुप्त बैठक झालेली नाहीये. यामध्ये कोणतंही तथ्य नाहीये”, असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी या बातम्यांवर स्पष्टपणे उत्तर दिलं आहे.
दरम्यान, ठाकरे गटातील आठ खासदार हे एकनाश शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. या आठ खासदारांमध्ये अरविंद सावंत यांचंही नाव घेतलं जात आहे. तर याबाबत आता अरविंद सावंत यांनी स्वत: दिल्लीत पत्रकार परिषदत घेत मोठा खुलासा केला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, ठाकरे गटातून शिंदेच्या गटात कोण कोणते आठ खासदार जाणार आहेत. या आठ खासदारांमध्ये माझापण फोटो आहे. तुम्ही कालपर्यंत माझ्या सहकार्यांची नावं देत होता आणि आता माझाही फोटो दिला आहे. नशीब आमचं की तुम्ही अनिल देसाईंचं नाव घेतलं नाही. देशातील जनतेनं हे लक्षात घेतलं पाहिजे की खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. मी या बातमीचा कडाडून निषेध करतो, असं सावंत यांनी म्हटलं आहे.












