Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • बीडमध्ये क्रूरतेची परिसीमा! प्रेम प्रकरणातून तरुणावर अत्याचार; आधी त्याला झाडलं बांधलं अन् नंतर…
Top News

बीडमध्ये क्रूरतेची परिसीमा! प्रेम प्रकरणातून तरुणावर अत्याचार; आधी त्याला झाडलं बांधलं अन् नंतर…

Beed Crime News | आत्तापर्यंत आपण प्रेम प्रकरणावरून वाद झाल्याच्या किंवा मारहाण झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या पाहिल्या आहेत. तर आताही बीडमध्ये (Beed) अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणाच्या वादातून एका तरूणाला बेदम मारहाण करत त्याच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला असून एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; चारचाकी गाडी, सोने-चांदी देऊनही सासरच्यांची भूक भागली नाही, अंगावर गरम पाणी ओतत सुनेचा छळ

बीडमध्ये प्रेमसंबंधातून तरूणावर अत्याचार

बीडमधील मांजरसुंबा या ठिकाणी धक्कादायक घटना घडली आहे. मांजरसुंबा गावातील ज्ञानेश्वर कोकाटे या 23 वर्षीय तरूणाचे शेजारच्या गावातील एका तरूणीसोबत प्रेमसंबंध होते. याबाबतची माहिती तरूणीच्या नातेवाईकांना समजली होती. तर प्रेमसंबंधाची माहिची समजताच तरूणीच्या नातेवाईकांनी संतप्त होत ज्ञानेश्वरला गावात बोलावून घेतले होते. त्यानंतर तिथे त्यांनी ज्ञानेश्वरचा मोबाईल आणि दुचाकी काढून घेतली आणि त्याला एका झाडाला बांधून बेदम मारहाण केली.

तरूणीच्या नातेवाईकांनी ज्ञानेश्वरचा केला शारीरिक अन् मानसिक छळ

जेव्हा तरूणीच्या नातेवाईकांनी ज्ञानेश्वरला मारहाण केली तेव्हा त्यांनी त्याचे व्हिडीओ देखील बनवले. तरूणीचे नातेवाईक एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी संपूर्ण गावात ज्ञानेश्वर ‘चोर’ असल्याचं सागंत त्याची बदनामी केली. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.

तरूणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या या अपमानास्पद वागणुकीमुळे आणि शारीरिक जाचामुळे ज्ञानेश्वर मानसिक तणावात होता. तर माणसिक तणावातून ज्ञानेश्वरने टोकाचे पाऊल उचलायचे ठरवले. त्याने धुळे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका टायर पंक्चरच्या दुकानामध्ये गळफास लावून आपले जीवन संपवले.

सुसाईड नोट लिहीत ज्ञानेश्वरने केली आत्महत्या

आत्महत्या करण्यापूर्वी ज्ञानेश्वरने एक सुसाईड नोट लिहिली होती. तरूणीच्या नातेवाईकांनी मला खूप मारले. मला गावात चोर म्हणून बदनाम केले आणि मला जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या, असं ज्ञानेश्वरने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. तर त्याने आरोपींच्या नावाचा उल्लेख देखील सुसाईड नोटमध्ये केला आहे. ज्ञानेश्वरच्या आत्महत्येनंतर त्याची आई कौशल्या कोकाटे यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. “माझ्या मुलाला बोलावून घेतले आणि त्याला झाडाला बांधून मारहाण केली. त्याचे व्हिडीओ देखील काढले. त्यामुळे माझ्या मुलाला मारहाण करणाऱ्या नराधमांवर कारवाई झाली पाहिजे”, अशी मागणी ज्ञानेश्वरच्या आईने केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी नेकनूर पोलीस स्थानकात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुसाईड नोटच्या आधारे आणि ज्ञानेश्वरच्या आईने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts