Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • अमेरिकाच्या शेजारील देशाचा 7 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचा झटका; कोणत्याही नुकसानीचं वृत्त नाही
वर्ल्ड

अमेरिकाच्या शेजारील देशाचा 7 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचा झटका; कोणत्याही नुकसानीचं वृत्त नाही

7 magnitude earthquake tremors felt in America’s neighbouring country; no damage reported

7.0 Magnitude Earthquake Hits Near USA : शनिवारी अलास्का आणि कॅनेडियन प्रदेश युकोन यांच्या सीमेजवळील एका दुर्गम भागात 7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. हा भूकंप सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होता. त्यानंतर अनेक लहान धक्के जाणवले. या शक्तिशाली भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. कोणत्याही नुकसानीचं वृत्त नाही.

भूकंप कुठं झाला :

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, हा भूकंप अलास्काच्या वायव्येस सुमारे 370 किलोमीटर आणि युकोनच्या व्हाइटहॉर्सच्या पश्चिमेस 250 किलोमीटर अंतरावर झाला. यूएसजीएसनुसार, हा भूकंप 662 लोकसंख्या असलेल्या अलास्काच्या याकुटाटपासून सुमारे 91 किलोमीटर अंतरावर होता.

स्थानिक पोलिसांनी काय म्हटलं :

रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस अधिकारी सार्जंट कॅलिस्टा मॅकलॉड म्हणाले की त्यांच्या टीमला या शक्तिशाली भूकंपाबद्दल दोन कॉल आले. मॅकलॉड म्हणाल्या, “भूकंप इतका तीव्र होता की सर्वांना तो जाणवला. लोक सोशल मीडियावर प्रतिक्रिया शेअर करत आहेत.”

हे ही वाचा : सुदानच्या निमलष्करी दलांचा एका किंडरगार्टनवर ड्रोन हल्ला; 33 मुलांसह 50 हून नागरिकांचा मृत्यू

युकोनचा पर्वतीय भाग सर्वाधिक प्रभावित :

कॅनडाच्या नैसर्गिक संसाधन विभागाचे भूकंपशास्त्रज्ञ अ‍ॅलिसन बर्ड म्हणाले की, भूकंपाचा सर्वाधिक परिणाम युकोन प्रदेश डोंगराळ आहे, तिथं खूप कमी लोक राहतात. “बहुतेक लोकांनी शेल्फ आणि भिंतींवरून वस्तू पडल्याचं सांगितलं.” बर्ड म्हणाले, “भूकंपामुळं जास्त नुकसान झालं असं दिसत नाही.”

भूकंपग्रस्त भागाची लोकसंख्या किती :

बर्ड म्हणाले की, भूकंपाच्या केंद्रापासून सर्वात जवळचा कॅनेडियन समुदाय हेन्स जंक्शन होता, जो सुमारे 80 मैल (130 किलोमीटर) अंतरावर होता. युकोन ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने 2022 मध्ये त्यांची लोकसंख्या 1018 नोंदवली. यूएसजीएसनुसार, भूकंप अलास्काच्या याकुटाटपासून सुमारे 56 मैल (91 किलोमीटर) अंतरावर झाला, जिथं 662 लोक राहतात. भूकंप 10 किलोमीटर खोलीवर झाला. त्यानंतर अनेक लहान धक्के बसले.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts