Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • सावधान ..! भारतातील CCTV कॅमेऱ्यांचे ‘लाईव्ह फुटेज’ थेट सरहद्दीपार पाकिस्तानात
Top News

सावधान ..! भारतातील CCTV कॅमेऱ्यांचे ‘लाईव्ह फुटेज’ थेट सरहद्दीपार पाकिस्तानात

cctv

CCTV Racket : गाझियाबादमध्ये (gaziyabad)पाकिस्तानशी (pakistan) संबंधित एक मोठे रॅकेट समोर आले आहे. देशातील अनेक संवेदनशील ठिकाणांवर CCTV लावले जात आहेत. या CCTV कॅमेऱ्यांचे ‘लाईव्ह फुटेज’ थेट सरहद्दीपार पाकिस्तानात पाठवले जात होते. यामुळे संपूर्ण देशातील CCTV नेटवर्कच्या सुरक्षेवर गंभीर प्रशचिन्ह निर्माण झाले आहे.

हे ही वाचा: पश्चिम आशियातील युद्धाचा इम्पॅक्ट औषधांवरही…!

केंद्र सरकारने उचलली तत्काळ पावले

दरम्यान, हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर केंद्र सरकारने तत्काळ पावले उचलली आहेत. गृह मंत्रालयाने इंटेलिजन्स ब्युरो (IB) आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने देशभरातील CCTV नेटवर्कचे ऑडिट (सुरक्षा तपासणी) केली जाणार आहे. सरकारी कार्यालये, विमानतळ आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवरील कॅमेऱ्यांची सुरक्षा प्राधान्याने तपासण्याचा निर्णय घेतला आहे.

चीनच्या कॅमेऱ्यांमधून डेटा चोरी होण्याचा मोठा धोका

भारतात ८० टक्के CCTV कॅमेरे वापरले जातात. हे सर्व CCTV कॅमेरे चीनमध्ये बनलेले आहेत. या कॅमेऱ्यांमधून डेटा चोरी होण्याचा मोठा धोका आहे. त्याचबरोबर परकीय देशांतील सर्व्हर डाउन होण्याचा धोकाही मोठा आहे. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. गाझियाबादमधील घटनेने या भीतीला दुजोरा दिला असून, स्वस्त चिनी तंत्रज्ञान देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी किती घातक ठरू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

१ एप्रिलपासून फक्त ‘हॅकिंगप्रूफ’ कॅमेऱ्यांचीच विक्री

सुरक्षेतील या त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने कडक नियमावली जाहीर केली आहे. १ एप्रिलपासून बाजारपेठेत फक्त अशाच CCTV कॅमेऱ्यांची विक्री करता येईल जे हॅकिंगप्रूफ (Hacking Proof) असतील. ज्यांना सरकारी सुरक्षा तपासणीचे (STQC Certification) प्रमाणपत्र मिळाले असेल. सध्याच्या घडीला केवळ ७ कंपन्यांचे ५३ मॉडेल्स असे आहेत, ज्यांना सरकारने सुरक्षित मानले असून त्यांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळाली आहेत.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts