Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • हाँगकाँगमध्ये बहुमजली इमारतींना भीषण आग; 44 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी
Top News

हाँगकाँगमध्ये बहुमजली इमारतींना भीषण आग; 44 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

Massive fire in Hong Kong multistorey buildings with smoke and rescue operations in progress

Hong Kong Building Fire : हाँगकाँगमधील तैपोतील अनेक बहुमजली इमारतींना आग लागली. आग वाऱ्यासारखी पसरली. ज्यावेळी आगीची घटना घडली, त्यावेळी लोक मोठ्या संख्येने घरात होते. लोकांना घरातून बाहेर पडण्याची संधी देखील मिळाली नाही. स्थानिक माध्यमांनी अग्निशमन सेवा विभाग (FSD) च्या हवाल्याने सांगितले की, भीषण आगीमुळे अनेक लोक इमारतींमध्ये अडकले होते. या आगीच्या घटनेत आतापर्यंत जवळपास 44 जणांचा मृत्यू झालाय.

आगीत होरपळून अनेकांचा मृत्यू :

आगीचे लोट अनेक किलोमीटर अंतरावरून दिसत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शहरातील तैपो जिल्ह्यातील कॉम्प्लेक्सच्या बाहेर असलेल्या बाबूंमुळे आग पसरली. ही आग झपाट्याने वाढली. या आगीमध्ये 44 लोकांचा जीव गेला तर अजूनही लोकांचा शोध घेतला जात आहे. सर्च ऑपरेशन सुरू असून प्रशासनाकडून मदत केली जात आहे. या आगीच्या घटनेने काही लोक घर सोडून पळाल्याचीही माहिती मिळत आहे.

हे ही वाचा : माजी पंतप्रधान इमरान खानची जेलमध्ये हत्या! पाकिस्तानात अफवांचं पेव

आगीचं नेमकं कारण काय? :

अहवालानुसार, तपासकर्त्यांना अपार्टमेंटच्या काही खिडक्या बंद करणाऱ्या ज्वलनशील पाट्यांवर कंपनीचे नाव लिहिलेले आढळले. पोलिसांनी त्यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप केलाय. अधिकाऱ्यांना असाही संशय आहे की, साइटवरील इतर बांधकाम साहित्य, जसे की संरक्षक जाळी, कॅनव्हास शीट आणि प्लास्टिकचे आवरण, आवश्यक सुरक्षा मानकांची पूर्तता करत नव्हते.

16 तास सुरु होती आग :

या कॉम्प्लेक्सच्या आठ टॉवरपैकी सात टॉवर्समध्ये अनेक वृद्ध रहिवासी राहत होते. हाँगकाँगमधील जवळजवळ ३० वर्षांतील ही सर्वात भीषण आग असल्याचे मानले जाते. ही आग सुमारे १६ तास सुरू होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक प्रभावित झालेल्या तीन टॉवर्सवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी सांगितले की, इतर चार इमारतींमधील आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे.

आग वेगानं पसरली :

आग इतक्या लवकर कशी पसरली याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वृत्तानुसार, अग्निशमन सेवा संचालक अँडी येउंग म्हणाले की, अनेक युनिट्समध्ये खिडक्या बंद करणारे पॉलिस्टीरिन बोर्ड पाहून कर्मचाऱ्यांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, “हे पॉलिस्टीरिन बोर्ड अत्यंत ज्वलनशील आहेत आणि आग खूप वेगाने पसरते.”

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts