Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • विदेशी गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यात काढले 1.14 लाख कोटी; भारतीय शेअर बाजारावर त्याचा काय परिणाम?
Top News

विदेशी गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यात काढले 1.14 लाख कोटी; भारतीय शेअर बाजारावर त्याचा काय परिणाम?

share bazar

indian share bazar : विदेशी गुंतवणूकदारांनी (Foreign Investors) मार्च महिन्यात आतापर्यंत सुमारे 1.14 लाख कोटी रुपये (सुमारे 12.3 अब्ज डॉलर) शेअर बाजारातून काढले आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात (indian share bazar)  खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये 94,017 कोटी रुपयांची माघार ही सर्वाधिक होती, पण यावेळीचा आकडा त्यालाही मागे टाकत आहे.

हे ही वाचा: ई-गव्हर्नन्समध्ये पुणे जिल्हा परिषदेने फडकावली यशाची पताका; राज्यात अव्वल

2026 मध्ये आतापर्यंत किती पैसा बाहेर गेला?

2026 वर्षाचा विचार केला, तर विदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत भारतीय बाजारातून एकूण 1.27 लाख कोटी रुपये काढले आहेत. NSDL च्या आकडेवारीनुसार, 27 मार्चपर्यंतच FPI ने 1,13,380 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. सध्या विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास काहीसा कमी झाला आहे.

मागील महिन्यात किती गुंतवणूक?

मागील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये FPI ने भारतीय बाजारात 22,615 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, जी मागील 17 महिन्यांतील सर्वोच्च पातळी होती. पण मार्चमध्ये चित्र पूर्णपणे बदलले आणि तेच गुंतवणूकदार आता मोठ्या प्रमाणात पैसे काढत आहेत. हा बदल बाजाराच्या मूडमध्ये अचानक झालेली घसरण दर्शवतो.

विदेशी गुंतवणूकदार विक्री का करत आहेत?

बाजार तज्ञांच्या मते, यामागे अनेक मोठी कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे पश्चिम आशियातील सुरू असलेला संघर्ष, ज्यामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली आहे. याशिवाय भारतीय रुपया कमकुवत होत आहे आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. या सर्व कारणांमुळे भारताच्या आर्थिक वाढीवर आणि कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होईल, अशी भीती विदेशी गुंतवणूकदारांना वाटत आहे, त्यामुळे ते सतत विक्री करत आहेत.

भारतीय शेअर बाजार अत्यंत संवेदनशील टप्प्यावर

भारतीय शेअर बाजार सध्या एका अत्यंत संवेदनशील टप्प्यावर उभा आहे. एकीकडे अमेरिका-इराणमधील शांतता कराराच्या बातम्यांमुळे बाजाराला काहीसा दिलासा मिळत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष युद्धभूमीवरील अनिश्चितता गुंतवणूकदारांची झोप उडवत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये चढ-उतार पाहायला मिळू शकतात.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts