Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • …तर जगासमोर इंटरनेट संकट? इराण कापणार समुद्राखालील केबल?
Top News

…तर जगासमोर इंटरनेट संकट? इराण कापणार समुद्राखालील केबल?

internet

Internet crisis in world : इराण-इस्राईल (iran-Israel) व अमेरिकेच्या (america)  युद्धामुळे आधीच जगभरात इंधन टंचाई (Fuel Shortage) निर्माण झाली, त्यामुळे जगात गोंधळ निर्माण झाला आहे. असे असताना आणखी एक मोठा धोका जगासमोर येण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण इराण होर्मुझमधऊन (Iran: Hormuz)जाणाऱ्या केबल्स कापून जगाचा डिजिटल संपर्क तोडण्याची भीती व्यक्त केली जातेय.

हे ही वाचा: “चाकणकर पुरावे नष्ट करतील…”, अशोक खरात प्रकरणात रूपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप, केला मोठा गौप्यस्फोट

समुद्राखालून जाणाऱ्या फायबर-ऑप्टिक केबल्सचे जाळे

होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील २० टक्के तेल आणि गॅस वाहतूक होते, याशिवाय डिजिटल नेटवर्कसाठी देखील हा मार्ग अत्यंत महत्वाचा मानला जातो. होर्मुझ आणि रेड सीमधील बाब अल मंदेब हे दोन्ही सागरी मार्ग डिजिटल रक्तवाहिन्या मानले जातात, कारण याच मार्गांवरून समुद्राखालून जाणाऱ्या फायबर-ऑप्टिक केबल्सचे जाळे पसरलेले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने समुद्री सुरुंग पेरल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंज आहे. तर, लाल समुद्रातील बाब अल मंदेब मार्गवर इराण समर्थक हुथी बंडखोर हल्ला करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बड्या कंपन्यांना मोठा फटका

ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या बड्या कंपन्यांनी संयुक्त अरब (uae)आणि सौदी अरेबियामध्ये डेटा सेंटर्स (Data centers in Arabia) उभारण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. हे क्षेत्र ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चे केंद्र (Artificial Intelligence) बनवण्याची त्यांची योजना आहे. मात्र, सध्याच्या युद्धामुळे या केबल्सची दुरुस्ती करणे अशक्य झाले आहे. लष्करी हालचालींमुळे दुरुस्ती करणारी जहाजे या भागात जाण्यास तयार नाहीत.

भारतावर याचा काय परिणाम?

तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, जर समुद्रातील या केबल्सना हानी पोहोचली, तर त्याचा फटका केवळ फोन किंवा वेबसाइट्स यांनाच नव्हे, तर बँकिंग, शेअर बाजार, रुग्णालयांना बसू शकतो. तसेच AI यंत्रणाही ठप्प होऊ शकतात. गल्फ देशांना याचा पहिला फटका बसेल, पण भारतालाही मोठ्या प्रमाणात इंटरनेट स्लोडाउनचा सामना करावा लागू शकतो. कारण भारताचे अनेक आंतरराष्ट्रीय डेटा कनेक्शन याच मार्गांवर अवलंबून आहेत, अशी माहिती आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts