Air New Zealand च्या CEO पदाची जबाबदारी निखिल रविशंकर हे 20 ऑक्टोबर 2025 पासून स्वीकारणार आहेत. सध्या ते कंपनीत Chief Digital Officer म्हणून कार्यरत असून, या पदावर विराजमान होणारे ते पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती ठरणार आहेत. त्यांच्या नियुक्तीवर काही ठिकाणी टीका झाली असून, सोशल मीडियावरील कमेंट्सही बंद करण्यात आल्या. Air New Zealand बोर्ड अध्यक्षा डेम थेरिस वॉल्श यांनी निखिल यांच्या उत्कृष्ट डिजिटल दृष्टीकोन, नेतृत्वगुण आणि जागतिक दृष्टिकोनाचे कौतुक केलं. निखिल म्हणाले, “ही संधी मिळाल्याने मी गौरवान्वित असून भविष्यातील वाटचाल घडवण्यास उत्सुक आहे.”












