रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसनं 2025 चा अर्थशास्त्रातील स्वेरिजेस रिक्सबँक पुरस्कार अल्फ्रेड नोबेलच्या स्मृतीप्रित्यर्थ म्हणजेच अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर केला आहे. या वर्षी, हा पुरस्कार जोएल मोकिर, फिलिप अघियन आणि पीटर हॉविट यांना “नवोपक्रम-चालित आर्थिक वाढीच्या स्पष्टीकरणासाठी” देण्यात आला आहे. अर्धे पारितोषिक मोकिर यांना “तंत्रज्ञानाच्या प्रगतीद्वारे शाश्वत विकासासाठी आवश्यक परिस्थिती ओळखल्याबद्दल” देण्यात येईल आणि उर्वरित अर्धे अघियन आणि हॉविट यांना “सर्जनशील विनाशातून शाश्वत विकासाच्या सिद्धांतासाठी” संयुक्तपणे देण्यात येईल.
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते कुठं संलग्न आहेत? :
जोएल मोकिर हे युनायटेड स्टेट्समधील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीचे आहेत. फिलिप अघियन हे फ्रान्समधील कॉलेज डी फ्रान्स आणि INSEAD आणि युनायटेड किंग्डममधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सचे आहेत. पीटर हॉविट हे युनायटेड स्टेट्समधील ब्राउन युनिव्हर्सिटीचे आहेत. शाश्वत विकासासाठी परिस्थिती ओळखल्याबद्दल त्यांना 2025 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराबद्दल माहिती :
– अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार आतापर्यंत 99 व्यक्तींना देण्यात आला आहे.
– अर्थशास्त्रातील हा पुरस्कार 1968 मध्ये स्थापन करण्यात आला.
– 1969 पासून अर्थशास्त्रातील हा पुरस्कार 56 वेळा देण्यात आला आहे.
– अर्थशास्त्रातील हा पुरस्कार मिळविणारी सर्वात तरुण व्यक्ती एस्थर डुफ्लो होती, वयाच्या 46 व्या वर्षी.
– अर्थशास्त्रातील हा पुरस्कार मिळविणारी सर्वात वयस्कर व्यक्ती लिओनिड हर्विक्झ होती, वयाच्या 90 व्या वर्षी.
अर्थशास्त्रातील नोबेल मेमोरियल पुरस्कार आयोजित करणाऱ्या रॉयल स्वीडिश सोसायटीनं विजेत्यांची घोषणा केली. गेल्या वर्षीचा पुरस्कार तीन अर्थशास्त्रज्ञांना, डॅरॉन असेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए. रॉबिन्सन यांना काही देश श्रीमंत आणि काही गरीब का आहेत याचा अभ्यास करण्यासाठी देण्यात आला होता. त्यांच्या संशोधनातून असं दिसून आलं की अधिक मुक्त, अधिक खुल्या समाजांमध्ये समृद्धी येण्याची शक्यता जास्त असते.
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 1968 मध्ये स्थापन झाला :
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार औपचारिकपणे बँक ऑफ स्वीडन पुरस्कार इन इकॉनॉमिक सायन्सेस इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल म्हणून ओळखला जातो. 19व्या शतकातील स्वीडिश उद्योगपती आणि रसायनशास्त्रज्ञ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 1968 मध्ये मध्यवर्ती बँकेनं याची स्थापना केली.
नोबेलनं डायनामाइटचा शोध लावला आणि पाच नोबेल पारितोषिकं दिली. तेव्हापासून, एकूण 96 विजेत्यांना 56 वेळा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आजपर्यंत, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्यांमध्ये फक्त तीन महिलांचा समावेश आहे. काही तज्ञांचा असा युक्तिवाद आहे की अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक तांत्रिकदृष्ट्या नोबेल पारितोषिक नाही, परंतु ते नेहमीच इतर पारितोषिकांसह 10 डिसेंबर रोजी, दिलं जातं. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.