Pakistan Army IED attack : पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तूनख्वा प्रांतात पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य करुन आणखी एक हल्ला झाला आहे. बुधवारी सुरक्षा दलांच्या ताफ्याला लक्ष्य करुन हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला आयईडी स्फोटाचा वापर करुन करण्यात आला, ज्यामध्ये एका कॅप्टनसह किमान सहा पाकिस्तानी सैनिक ठार झाले. लष्कराच्या मीडिया विंग, इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर) नं हल्ल्याची माहिती दिली.
सुरक्षा दलांनी सुरु केली शोध मोहीम :
पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या अशांत कुर्रम आदिवासी जिल्ह्याच्या सुलतानी भागात झाला. त्यानंतर झालेल्या गोळीबारात सात अतिरेकी ठार झाले. आयईडी स्फोटामुळंही मोठं नुकसान झालं. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे आणि शोध मोहीम सुरू केली आहे.
STORY | 6 soldiers killed in IED blast in Pakistan’s Khyber Pakhtunkhwa
At least six soldiers, including a Captain, were killed in an IED blast targeting a convoy of the security forces in Pakistan’s northwestern Khyber Pakhtunkhwa province on Wednesday, the Inter Services… pic.twitter.com/oCfsxfUskc
— Press Trust of India (@PTI_News) October 29, 2025
एका पोलिस चौकीवर हल्ला :
अलीकडेच, खैबर पख्तूनख्वा इथं दहशतवाद्यांनी एका पोलिस चौकीवर हल्ला केला, ज्यामध्ये एक पोलिस ठार झाला आणि एक निमलष्करी सैनिक जखमी झाला. कोहट जिल्ह्यातील दारा आदम खेळ येथील तोर चप्पूर पोलिस चौकीवर रात्री हा हल्ला झाला.
यापूर्वीही झाले असे हल्ले (Pakistan Army IED attack)
खैबर पख्तूनख्वा इथं सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले आहेत, जिथं दहशतवादी घटना वारंवार घडत आहेत. अलिकडेच, अज्ञात बंदूकधाऱ्यांनी फ्रंटियर कॉर्प्सच्या वाहनावर हल्ला केला. त्यानंतर झालेल्या गोळीबारात एक सुरक्षा कर्मचारी ठार झाला आणि दुसरा जखमी झाला. हा हल्ला उत्तर वझिरीस्तानच्या सीमेवर असलेल्या बन्नू जिल्ह्यात झाला.












