Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं (ICT-BD) पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध निकाल दिला आहे. न्यायालयानं त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधिकरणानं म्हटलं आहे की त्यांनी मानवाधिकार संघटना आणि इतर संघटनांच्या असंख्य अहवालांचा विचार केला आहे. त्यात शेख हसीना यांनी केलेल्या अत्याचारांचीही सविस्तर माहिती दिली आहे. न्यायाधिकरणानं आपल्या निकालात असंही म्हटलं आहे की मोठ्या संख्येनं निदर्शक मारले गेले. न्यायाधिकरणानं असंही म्हटलं आहे की अवामी लीगचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि पक्षाच्या नेतृत्वाच्या पूर्ण माहितीसह पूर्वनियोजित हल्ले केले.
हे ही वाचा – सौदी अरेबियात बसचा भयंकर अपघात; 40 हून अधिक भारतीयांचा मृत्यू
हसीनाला मृत्युदंडाची शिक्षा :
वकिलांनी दोषींना मृत्युदंडाची मागणी केली होती. ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या व्यापक उठावाशी संबंधित अनेक आरोप हसीना (78) यांच्यावर आहेत ज्यामुळं त्यांना पद सोडावं लागलं. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाच्या अहवालात असा अंदाज आहे की 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान झालेल्या “विद्रोह” दरम्यान, हसीना सरकारच्या आदेशानंतर लुमारे 1400 लोक मारले गेले.
A Bangladesh court convicted ousted Prime Minister Sheikh Hasina of crimes against humanity, concluding a months-long trial that found her guilty of ordering a deadly crackdown on a student-led uprising last year, reports Reuters. pic.twitter.com/QJnO7DM8VO
— ANI (@ANI) November 17, 2025
शेख हसीना यांनी केलं निवेदन जारी (Sheikh Hasina death sentence)
न्यायालयाच्या निर्णयापूर्वी शेख हसीना यांचं विधान देखील समोर आलं. त्यांच्या निवेदनात, त्यांनी सर्व आरोप पूर्णपणे खोटे असल्याचा दावा केला होता. एका ऑडिओ संदेशात हसीना म्हणाल्या, “आपण असे बरेच हल्ले आणि प्रकरणे पाहिली आहेत. मला त्याची पर्वा नाही. अल्लाहनं मला जीवन दिलं आहे आणि एक दिवस मी मरेन, पण मी देशातील लोकांसाठी काम करत आहे आणि करत राहीन. आपल्या संविधानाच्या कलम 7(ब) मध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की जो कोणी निवडून आलेल्या प्रतिनिधींना जबरदस्तीनं सत्तेवरून काढून टाकेल त्याला शिक्षा होईल. युनूसनं हेच केलं (जबरदस्तीने मला सत्तेवरुन काढून टाकलं). जर कोणी न्यायालयात खोटी तक्रार दाखल केली तर त्यांच्यावर कायद्यानुसार खटला चालवला जाईल आणि एक दिवस हे घडेल.” त्यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शिक्षेची काळजी करु नका असं सांगितलं आहे.












