Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • इराणचा बदला सुरू? ट्रम्प थोडक्यात बचावले! थेट व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार…
Top News

इराणचा बदला सुरू? ट्रम्प थोडक्यात बचावले! थेट व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार…

Trump White House firing Iran

Trump White House firing Iran : जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाला आज बरोबर एक महिना पूर्ण झालाय. पण गेल्या काही तासांत अमेरिकेतून जी बातमी समोर आली आहे, तिने संपूर्ण जगाला हादरवून सोडलंय.

काही तासापुर्वी अमेरिका हादरल्याचं चित्र पहायला मिळालं.. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसच्या परिसरात गोळीबार झाला .गोळीबाराच्या या घटनेनंतर सगळीकडे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गोळीबाराची घटना घडली तेव्हा डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्येच होते. त्यामुळे युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांच्याच जीवाला धोका असल्याच्या चर्चांना उधान आलंय.

व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार..

जगातील सर्वात सुरक्षित इमारत, जिथे साधी माशीही परवानगीशिवाय शिरू शकत नाही, त्या ‘व्हाईट हाऊस’च्या परिसरात गोळ्या झाडण्यात आल्या आहेत! ज्या वेळी हा थरार घडला, तेव्हा खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याच इमारतीत होते. हा केवळ गोळीबार आहे की ट्रम्प यांना संपवण्याचा आंतरराष्ट्रीय कट? इराणच्या धमक्यांनंतर आता व्हाईट हाऊस खरोखरच ‘टार्गेट’वर आहे का? याविषयी थोडक्यात माहिती घेऊया..

धोका थेट राष्ट्राध्यक्षांच्या उंबरठ्यापर्यंत

वॉशिंग्टन डीसीमधील लाफायेट पार्क… हे तेच ठिकाण आहे जे व्हाईट हाऊसच्या अगदी समोर आहे. नेहमी पर्यटकांनी गजबजलेल्या या भागात अचानक गोळ्यांचा आवाज घुमला आणि एका क्षणात सगळीकडे पळापळ सुरू झाली. अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसने तात्काळ व्हाईट हाऊसचे सर्व दरवाजे बंद केले. कारण धोका थेट राष्ट्राध्यक्षांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला होता.

पोलिसांकडून संपूर्ण वाॅशिंग्टन शहराची नाकेबंदी

धक्कादायक बाब म्हणजे, गोळीबार करणारा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. एका संशयास्पद वाहनातून हा आरोपी आल्याची प्राथमिक माहिती आहे. अमेरिकेच्या एफबीआय आणि स्थानिक पोलिसांनी संपूर्ण वॉशिंग्टन शहराची नाकेबंदी केली आहे. प्रत्येक संशयास्पद व्यक्तीची झडती घेतली जातेय. पण प्रश्न हा आहे की, एवढ्या कडक सुरक्षेत आरोपी शस्त्रासह पोहोचलाच कसा?

अमेरिकेच्या सुरक्षेला दिलेलं हे दुसरं मोठं आव्हान

ही काही पहिलीच घटना नाही. गेल्या सात दिवसांत अमेरिकेच्या सुरक्षेला दिलेलं हे दुसरं मोठं आव्हान आहे. मागच्या आठवड्यात फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांच्या वास्तव्यादरम्यान एका अज्ञात विमानाने हवाई क्षेत्राचं उल्लंघन केलं होतं. तेव्हा F-16 फायटर जेट्सना आकाशात झेप घ्यावी लागली होती. आणि आता थेट ‘कॅपिटल हिल’च्या परिसरात गोळीबार! हे सर्व संकेत एका मोठ्या कटाकडे निर्देश करत आहेत का असा ही प्रश्न आहे.

ट्रम्पची ‘ती’ धमकी इराणच्या जिव्हारी लागली

अमेरिका-इराण युद्धाची ठिणगी आता वणवा बनली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला जगाचा व्यापार रोखल्याबद्दल निर्वाणीचा इशारा दिलाय. “होर्मुझची सामुद्रधुनी सुरू करा, अन्यथा इराणला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,” ही ट्रम्प यांची धमकी इराणच्या जिव्हारी लागली आहे. इराणनेही स्पष्ट केलंय की, आमचा बदला केवळ सीमेवर नसेल, तर तो शत्रूच्या घरात असेल. मग हा गोळीबार इराणने दिलेल्या त्याच धमकीचा भाग आहे का?

व्हाईट हाऊसबाहेरच्या या गोळीबाराने अमेरिकेच्या अहंकाराला मोठी चपराक लगावली आहे. एकीकडे सात समुद्रापार इराणला हरवण्याचे स्वप्न पाहणारी अमेरिका, आज स्वतःच्याच राजधानीत असुरक्षित असल्याचं चित्र निर्माण झालंय. आरोपी पकडला जाईलच, पण या घटनेमुळे पेटलेलं युद्धाचं रणांगण आता शांत होईल की अधिक भडकेल हे येणारा काळच सांगेल.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts