Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टमध्ये भारताचे स्थान कुठे?
Top News

वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टमध्ये भारताचे स्थान कुठे?

pollution

World Air Quality Report 2025 : स्विस वायु गुणवत्ता तंत्रज्ञान कंपनीने (Swiss Air Quality Technology Company) वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट (world air quality report) 2025 जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये भारत जगातील सहावा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. या रिपोर्टवरून भारतात प्रदूषण वाढीची समस्या कायम आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणावर केंद्र सरकारने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.

हे ही वाचा: रेल्वेचा प्रवाशांना झटका; परताव्याचा फटका

गाझियाबाद जिल्ह्यातील लोनी हे शहर सर्वाधिक प्रदूषित

2025 मध्ये गाझियाबाद जिल्ह्यातील लोनी हे शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले, जिथे PM2.5 ची वार्षिक सरासरी 112.5 µg/m³ नोंदली गेली. त्यामध्ये WHO ने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा सुमारे 22 पट जास्त आहे. जगभरातील राजधानी शहरांमध्ये नवी दिल्लीसर्वाधिक प्रदूषित राजधानी म्हणून पहिल्या क्रमांकावर राहिले, जिथे PM2.5 ची सरासरी 82.2 µg/m³ होती.

भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरेair

IQAir च्या या अहवालात 143 देश, प्रदेश आणि भागांतील 9,446 शहरांमधील PM2.5 डेटा दिले आहेत. हा डेटा 40,000 हून अधिक नियामक निरीक्षण केंद्रे आणि कमी किमतीच्या सेन्सरमधून गोळा करण्यात आला आहे. या अहवालानुसार, जागतिक स्तरावर केवळ 13 देश-प्रदेश WHO च्या 5 µg/m³ या वार्षिक मार्गदर्शक तत्त्वांनुसार PM2.5 पातळी राखू शकले, यापैकी बहुतांश लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन भागात आहेत.

पाकिस्तान हा सर्वाधिक प्रदूषित देश

2025 मध्ये पाकिस्तान हा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला, जिथे PM2.5 ची सरासरी 67.3 µg/m³ होती. भारत 48.9 µg/m³ सह सहाव्या स्थानावर राहिला. त्याच्या पुढे बांगलादेश (66.1), ताजिकिस्तान (57.3), चाड (53.6) आणि काँगो लोकतांत्रिक प्रजासत्ताक (50.2) आहेत. जगातील राजधानी शहरांमध्ये New Delhi पहिल्या क्रमांकावर राहिले, त्यानंतर ढाका (बांगलादेश) आणि दुशांबे (ताजिकिस्तान) क्रमशः दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts