अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक युद्ध छेडलं आहे. एक दोन देशांसोबत नाही तर संपूर्ण जगा सोबत. अगोदर टॅरीफ लावून जगाला झुकवण्याचा प्रयत्न केला. काही झुकले आणि काही म्हणाले, “आम्हाला फरक नाही पडत.” आणि त्या देशात नाव येत चीन आणि भारत. चीन ला सुरवातीला 250% पर्यंत tariff आखला पण चीन घाबरला नाही आणि झुकला ही नाही, शेवटी अमेरिकेलाच झुकाव लागलं आणि व्यापार सुरळीत करण्यासाठी अमेरिकेनेच पुढाकार घेतला. पण त्याचा व्यापारिक संबंध अजूनही नाजूक धाग्यावर टिकले आहेत, पण ते केव्हा तुटेल सांगता येत नाही.
भारतावर तर अमेरिकेचं जास्त प्रेम उतू गेलं, ट्रम्प साहेबाना समोरा समोर येऊन भारताशी संबंध बिघडवणं योग्य वाटलं नाही, खूप अभ्यास करून भारताची चूक शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण खूप घाम गाळून एक चूक सापडली, ती म्हणजे रशिया कडून भारताची कच्या तेलाची खरेदी. मग भारतावर ट्रम्प साहेबांचा थेट हल्ला झाला. ते म्हणाले, “रशिया कडून कच्च तेल खरेदी करणं बंद करा नाही तर आम्ही टॅरीफ लावू.” भारताने ठाम भूमिका मांडली आणि भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, ‘आम्हाला आमचे व्यवहार कुणाशी ठेवायचे आणि कुणाशी नाही हे आम्हाला सांगू नये आणि स्वतः रशिया कडून युरेनियम सारखे पदार्थ विकत घेत आहेत हे लक्षात ठेवा.”
त्यानंतर भारतावर टॅरीफ वर टॅरीफ लादले गेले. आणि त्यावर अतिरिक्त दंडही लावण्याचा खेळ सुरु झाला. एवढ्या वरच अमेरिकेची नौटंकी थांबली नाही तर त्यांनी भारतीय लोकांना अमेरिकेत डिवचले. ते म्हणाले, अमेरिका फर्स्ट, म्हणजे अमेरिकन लोकांना अगोदर जॉब द्या, पण अमेरिका नेहमी विसरतो अमेरिकेच्या जेवढ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांची मालकी भारतीयांकडे आहे, मग ते गुगल असो की व्हिसा. मग The H-1B व्हिसा वर प्रतिबंध घातले, भारतावर लावलेले निर्बंध ठीक होते, कारण भारताची प्रगती बघवत नसावी, ट्रम्प साहेबांनी भारताबरोबर जवळ जवळ 40 देशांचे व्हिसा ब्लॅकलिस्टेड केले, मग ते शिक्षणासाठी येण्याची इच्छा ठेवत असो की जॉबसाठी.
ट्रम्प साहेब, आपल्या शाळेतल्या एका खोडकर विद्यार्थ्यांसारखे वागतात त्यांनी भारताशी पूर्णपणे व्यावहारिक युद्धच छेडलंय, त्यांनी अमेरिका कंपनी जे त्यांचं उत्पादन भारतात करतात त्यांना पण धमकावले की, भारतात जाऊ नका पण, चीन पेक्षा आता लोक भारतात उत्पादन करायचं विचार करतात. अमेरिकेत लेबर कॉस्ट खूप महाग आहे, त्यामुळे भारताचं लेबर कॉस्ट स्वस्त वाटतं, त्यामुळं कोरियाची सॅमसंग सुद्धा भारतात उत्पादनाला प्राधान्य देत आहेत. तोच विचार करून अँपल ने भारतात उत्पादनाचे केंद्र वाढवण्याचे प्रयत्न सुरु केले होते. तेवढ्यातच ट्रम्प साहेबांनी अँपलने आपले उत्पादन भारतातून कमी करत संपवावं आणि अमेरिकेतच करावं, पण अँपल ने ट्रम्प साहेबांकडे कानाडोळा करत भारतातील उत्पादन सुरूच ठेवले.
अँपलच्या उत्पादनात मुख्य भागीदार फॉक्सकॉन आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स आहेत, भारतात मोठ्या प्रमाणात आयफोन चे उत्पादन वाढत आहेत. मार्च 2025 ला संपलेल्या वित्तीय वर्षात भारताने अँपल ला $22 बिलियन किंमतीचे आयफोन्स बनवून दिले. एवढच नाही तर अँपलने भारतात अँपल स्टोअर्स पण उघडलेत, ज्यामुळे भारतात गुंतवणूक वाढली आहे आणि जॉब पण भारतीयांना भेटत आहेत. असो भारत आता झुकणार नाही मग तो व्यावहारिक युद्ध असो किंवा इतर कुठलं युद्ध, भारत शेवट पर्यंत लढणार आणि जिंकणार सुद्धा.
-अमित आडते (लेखक)