• Home
  • देश
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली थेट धमकी; म्हणाले, आम्ही इतका मोठा हल्ला करणार की तुम्ही…
Top News

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली थेट धमकी; म्हणाले, आम्ही इतका मोठा हल्ला करणार की तुम्ही…

trump

Donald Trump | अमेरिका (America) आणि इस्त्रायल (Israel) या दोन देशांनी केलेल्या हवाई हल्ल्यात (Air Strike) इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई (Supreme Leader Ayatollah Ali Khameneni)  यांचा मृत्यू झाला आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर अमेरिका (America) आणि इराणमध्ये (Iran) युद्धाचा भडका उडाला आहे. संतप्त इराणने अमेरिकेवर मोठा हल्ला करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता हे युद्ध चांगलंच पेटलं आहे. एकिकडे इराणने हल्ल्याचा इशारा दिला असताना दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनीही इराणला थेट धमकी दिली आहे, ज्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – युद्धाच्या विळख्यात अडकले पुण्याचे 84 जण; विद्यार्थी अन् शिक्षकांचा समावेश, भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय धमकी दिली?

इराणने हल्ला करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला धमकी दिली. अमेरिकेवर हल्ला करण्याचा विचारही करू नका. तसेच आजच इराणवर अत्यंत मोठा हल्ला केला जाणार आहे, ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नसावा, अशी थेट धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

तसेच जर इराणने आमच्यावर हल्ला केला तर त्यांना खूप वाईट परिणामांना सामोरं जावं लागेल, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये बसून इराणमध्ये नेमकं काय सुरू आहे, याची माहिती घेत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत काही प्रमुख नेते देखील उपस्थित आहेत.

दुसरीकडे, इराणच्या NSA ने म्हटले आहे की, अमेरिकेने आमची मने दुखावली आहेत, त्यामुळे त्यांना आम्ही चोख उत्तर देऊ. आम्ही आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेणार, असा इशारा NSA ने दिला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts