Trump India Tariff 2026 : भारताला ज्याची भीती होती तेच घडलंय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 100% टॅरिफ विधेयकावर स्वाक्षरी केलीये…यामुळे आता भारत चीनवर 100% टॅरिफचे मोठं संकट आलंय…पण यात चीनला भिती सारखं काहीच नाहीये…कारण ट्रम्प चीनवर काही टॅरिफ लावू शकत नाही…मागच्या वेळी ट्रम्प यांनी चीनवर टॅरिफ लावले आणि चीनने अमेरिकेला रेअर अर्थ मिनिरल देण्याचे थांबवले होते…यामुळे ट्रम्प यांना माघार घ्यावी लागली…पण भारताकडे असं काहीच नाही की ज्यामुळे ट्रम्प माघार घेतली..
उलट भारत सरकार ट्रम्प यांच्या सर्व गोष्टीला होकार दिलाय तरीही ट्रम्प भारताची बदनामी करत आहेत…पीएम मोदी ट्रम्प यांना मित्र मानतात..पण ट्रम्प हे नेहमीच भारताच्या पाठित खंजीर खुपसला आहे…भारताच्या नागरिकांना बेड्या ठोकून भारतात पाठवलं…भारताच्या तीन खलाशांना ठार केलं…आता ट्रम्प भारतावर दबाव आणण्यासाठी रशियन तेल खरेदीमुळे 100 टक्के टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहेत…पण भारत यावर प्रत्युत्तर म्हणून काय करतंय पाहूयात…
ट्रम्प यांनी रशिया-इराण निर्बंध विधेयकावर स्वाक्षरी केली ( Trump India Tariff 2026 )
आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र या शत्रू नसतो, तिथे फक्त स्वतःचे हितसंबंध महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं.. हे वाक्य आज भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांना तंतोतंत लागू पडत आहे… भारताने ज्या अमेरिकेला आपला सर्वात मोठा धोरणात्मक आणि सामरिक मित्र मानलं..ज्या ट्रम्पच्या प्रचाराला त्याच अमेरिकेने भारताच्या पाठीत व्यापारी खंजीर खुपसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे…नुकतीच ‘लिंडसे ओ. ग्रॅहम सॅंक्शनिंग रशिया अँड इराण ॲक्ट २०२६’ या अत्यंत वादग्रस्त विधेयकावर स्वाक्षरी करून ट्रम्प यांनी भारताला थेट आर्थिक कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे… रशियाकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी केल्याच्या कारणावरून भारतावर १००% पर्यंत आयात शुल्क लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे… दुसरीकडे, चीनसारख्या बलाढ्य देशासमोर ट्रम्प यांचे हे धोरण हतबल ठरताना दिसत आहे, तर भारताच्या बाबतीत मात्र अमेरिकेचे वर्तन एका विश्वासू मित्राच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे असल्याचा संताप देशातील राजकीय आणि व्यापारी वर्तुळातून व्यक्त होत आहे…
गेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वैयक्तिक मैत्रीचे जगभर कौतुक झाले… ‘हाऊडी मोदी’ आणि ‘नमस्ते ट्रम्प’ सारख्या भव्य कार्यक्रमांच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील संबंध एका नव्या उंचीवर पोहोचल्याचा दावा केला गेला… ट्रम्प यांनी अनेकदा मोदींना आपले उत्कृष्ट मित्र म्हटले… पण, जेव्हा धोरणात्मक निर्णयांची वेळ येते, तेव्हा ट्रम्प यांची ‘अमेरिका फर्स्ट’ ही भूमिका भारतासाठी डोकेदुखी ठरली आहे… नुकत्याच स्वाक्षरी झालेल्या 2026 च्या संरक्षण आणि निर्बंध कायद्यानुसार, रशिया आणि इराणकडून ऊर्जा खरेदी करणाऱ्या देशांवर 100 टक्के दंडात्मक टॅरिफ लावण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना मिळाला आहे… भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, हा यामागचा मुख्य हेतू आहे… पंतप्रधान मोदींनी ज्या ट्रम्प यांना सख्खा मित्र मानले, त्यांनीच भारताच्या ऊर्जा सुरक्षेला खिळ घालणारा हा कायदा आणल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या राजनैतिक धोरणांना मोठा धक्का बसला आहे… एका बाजूला मैत्रीचा आव आणायचा आणि दुसऱ्या बाजूला भारताच्या अर्थव्यवस्थेची नाडी आवळायची, हे ट्रम्प यांचे दुटप्पी धोरण आता उघड झाले आहे…
हेही वाचा : गरब्यासाठी ‘पार्टनर भाड्याने’? 1 ते 5 हजारांच्या जाहिरातीने खळबळ; महाराष्ट्रातही वाद
चीनकडे असलेल्या Rare Earth Minerals मुळे अमेरिकेची अडचण?
या संपूर्ण वादात सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे, ट्रम्प प्रशासन चीनवर अशा प्रकारचा 100% टॅरिफ लागू करण्याची हिंमत दाखवू शकत नाही… याचे कारण ट्रम्प यांचे चीनवर प्रेम आहे असे नाही, तर चीनकडे असलेले जागतिक व्यापाराचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे दुर्मिळ खनिजे ज्याला रेअर अर्थ मिनिरलही म्हणतात… स्मार्टफोन, कम्प्युटर्स, इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर चिप्स आणि अत्याधुनिक लष्करी उपकरणांसाठी लागणाऱ्या या दुर्मिळ खनिजांच्या जागतिक पुरवठ्यावर चीनचे 90 टक्क्यांहून अधिक नियंत्रण आहे… ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात जेव्हा चीनवर व्यापारी निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा चीनने अमेरिकेला या दुर्मिळ खनिजांचा पुरवठा रोखण्याची थेट धमकी दिली होती… अमेरिकेचे तंत्रज्ञान आणि वाहन उद्योग संपूर्णपणे कोलमडून पडतील या भीतीने ट्रम्प यांना तेव्हा माघार घ्यावी लागली होती…
सध्याही ट्रम्प ( Donald Trump ) आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात आगामी काळात शिखर बैठक होणार आहे… चीनकडे असलेल्या या खनिज संपत्तीमुळे अमेरिका त्यांच्याशी थेट आर्थिक युद्ध लढू शकत नाही… दुर्दैवाने, भारताकडे चीनसारखी जागतिक पुरवठा साखळी रोखून धरण्याची खनिज किंवा औद्योगिक मक्तेदारी नाही… भारत अजूनही मॅन्युफॅक्चरिंग आणि तंत्रज्ञानासाठी बऱ्याच अंशी आयातदार देश आहे… भारताकडे अमेरिकेला ब्लॅकमेल किंवा दबाव टाकण्यासाठी असे कोणतेही प्रभावी शस्त्र उपलब्ध नसल्यामुळेच, ट्रम्प प्रशासन चीनला सोडून भारताला सॉफ्ट टार्गेट करत आहे आणि 100% टॅरिफची तलवार भारताच्या मानेवर लावत आहे…
युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारत रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करत आहे..पण अमेरिकेने भारतावर दबाव टाकला की भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये…भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे कमी केले…तसंच ट्रम्प यांनी दबाव टाकला की भारताने इराणकडून तेल खरेदी करू नये…भारताने इराणकडून तेल खरेदी करणं बंद केलं…भारताने इराणधील चाबाहार पोर्टही करोडो रूपये लावून सोडून दिल्याची माहिती..पण भारताने अद्याप रशियाकडून पूर्णपणे तेल खरेदी करणं थांबवलेलं नाही…भारत रशियाकडून तेल खरेदी करून पुतिन यांच्या युद्धखर्चाला अप्रत्यक्षपणे मदत करत आहे, असा आरोप ट्रम्प यांचा आहे… याच कारणावरून भारताला धडा शिकवण्यासाठी ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदी करणाऱ्या पहिल्या पाच देशांवर 100% टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे… भारताने अमेरिकेच्या सर्वच आंतरराष्ट्रीय दबावांना अनेकदा होकार दिला असला, तरी या मुद्द्यावर भारताने झुकण्यास नकार दिला आहे…
अमेरिका-चीन व्यापार संघर्षाचा जुना अनुभव
ट्रम्प यांच्या भारतविरोधी आणि आक्रमक मानसिकतेचे सर्वात क्रूर उदाहरण म्हणजे अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या भारतीय नागरिकांवर झालेली कारवाई होय. ट्रम्प यांनी सत्तेत आल्यावर मोठ्या प्रमाणावर हाकलपट्टी मोहीम सुरू केली…हजारो भारतीय नागरिकांना पकडून विशेष विमानांद्वारे भारतात पाठवण्यात आले. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, या प्रवासादरम्यान भारतीय नागरिकांना गुन्हेगारांसारख्या हाता-पायात बेड्या आणि साखळ्या ठोकून आणण्यात आले होते… ज्या भारताला अमेरिका आपला धोरणात्मक भागीदार म्हणतो, त्या देशाच्या नागरिकांना अशी अमानुष वागणूक देणे हा केवळ त्या नागरिकांचा नाही, तर संपूर्ण भारताचा अपमान आहे, अशी भावना देशभरातून व्यक्त झाली… परंतु, मोदी सरकारने ट्रम्प यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे यावर कोणतीही आक्रमक जाहीर भूमिका घेतली नाही..
ट्रम्प प्रशासनाच्या इराणविरोधी आक्रमक लष्करी धोरणांचा फटका थेट निष्पाप भारतीय नागरिकांना बसला आहे… ओमानच्या समुद्रात आणि हार्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकन नौदलाने इराणच्या नाकेबंदीसाठी केलेल्या कारवाईत भारताला आपल्या पुत्रांना गमवावे लागले आहे… एका जहाजावर अमेरिकेच्या युद्धनौकेने क्षेपणास्त्र हल्ला केला… या हल्ल्यात जहाजावर कार्यरत असलेले तीन भारतीय खलाशी ठार झाले.. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षात भारताचा कोणताही थेट संबंध नसताना, अमेरिकेच्या बेजबाबदार लष्करी कारवाईमुळे भारतीय खलाशांना जीव गमवावा लागला… भारताने यावर तीव्र निषेध नोंदवला असला, तरी अमेरिकेने यावर केवळ युद्धकाळातील अनपेक्षित नुकसान म्हणून हात झटकले…
भारतीय निर्यातीवर आणि व्यापारावर संभाव्य परिणाम ( Trump India Tariff 2026 )
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प हे केवळ आर्थिक किंवा लष्करी पातळीवरच भारताची कोंडी करत नाहीत, तर ते जागतिक व्यासपीठावर भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्नही करत आहेत… ट्रम्प यांनी त्यांच्या जाहीर सभांमध्ये भारत आणि पाकिस्तान संदर्भात एक अत्यंत वादग्रस्त आणि तथ्यहीन दावा केला… त्यांनी असा दावा केला की, भारत आणि पाकिस्तानमध्ये एक भीषण अणुयुद्ध होणार होते… पण त्यांनी दोन्ही देशांना 250% टॅरिफ लावण्याची धमकी दिली, ज्यानंतर दोन्ही देशांचे नेते घाबरले आणि त्यांनी युद्ध मागे घेतले.. हा दावा पूर्णपणे खोटा आणि अतिशयोक्तीपूर्ण आहे… ट्रम्प यांनी स्वतःची आंतरराष्ट्रीय पातळीवर हिरो म्हणून प्रतिमा तयार करण्यासाठी भारतासारख्या जबाबदार अण्वस्त्रधारी देशाची जगासमोर घाबरणारा देश अशी बदनामी केली… भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणि नेतृत्वाची ही एक प्रकारे टिंगल उडवण्याचाच हा प्रकार होता..
अमेरिकेच्या या सातत्यपूर्ण दबावानंतर आता भारत सरकारनेही मवाळ भूमिका सोडण्याचे संकेत दिले आहेत. भारताच्या वाणिज्य आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, जर अमेरिकेने नवीन कायद्याचा वापर करून भारतीय उत्पादनांवर १००% टॅरिफ लादला, तर भारतही अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर दंडात्मक शुल्क लादण्यास मागेपुढे पाहणार नाही. भारत अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादने, संरक्षण साहित्य आणि विमानांचे सुटे भाग आयात करतो, ज्यावर भारत निर्बंध आणू शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूण कार्यपद्धतीवरून हे स्पष्ट होते की, त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांची मैत्री ही केवळ कॅमेऱ्यापुढील एक राजनैतिक नाटक आहे. प्रत्यक्ष व्यवहारात ट्रम्प हे भारताला कमी लेखीत आहे…भारताकडे जर चीनसारकी ताकद असते तर आज ट्रम्प यांची भारताकडे बोट करण्याची हिंमत झाली नसती..








