Maharashtra Dry Day Rule: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या ड्राय डेच्या नियमांत मोठा बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Dry Day Maharashtra: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या ड्राय डेच्या आदेशात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सलग तीन दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार असल्याने चिंतेत असलेल्या मद्यप्रेमींनी या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. सुधारित आदेशानुसार, पुणे जिल्ह्यात ड्राय डेची मर्यादा कमी (Pune liquor shops) करण्यात आली आहे.
राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील (teacher constituency election) निवडणुकांमुळे प्रशासनाने विशेष निर्बंध लागू केले होते. यामध्ये तीन पदवीधर आणि दोन शिक्षक (Pune latest news) मतदारसंघांचा समावेश आहे. या निवडणुकांसाठी एकूण १८२ उमेदवार रिंगणात असून, मतदानाची प्रक्रिया २३ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तर मतमोजणी २७ ऑक्टोबरला होणार आहे.
या निवडणुकांसाठी पाच मतदारसंघांत मिळून २ हजार ४१९ मतदार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडावी, यासाठी मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, या आदेशात आता सुधारणा करण्यात आल्याचे वृत्त आहे.
ड्राय डे किती दिवसांचा असणार?
सुरुवातीच्या आदेशानुसार सलग तीन दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याची तरतूद होती. मात्र, न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार, ड्राय डे केवळ मतदानाच्या दिवशी लागू राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
दारूची दुकाने कधी उघडणार?
मिळालेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान संपेपर्यंत, म्हणजे दुपारी ४ वाजेपर्यंत ड्राय डे लागू राहणार आहे. त्यामुळे मद्यविक्रीच्या वेळेबाबत दुकानदार आणि ग्राहकांनी संबंधित प्रशासनाने जारी केलेल्या अंतिम आदेशाची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
निवडणुकीच्या काळात मद्यविक्रीवरील निर्बंधांमध्ये झालेल्या या बदलामुळे नागरिकांचे लक्ष सुधारित आदेशाकडे लागले आहे. मात्र, हे नियम संबंधित जिल्ह्यातील अधिकृत अधिसूचनेनुसारच लागू होतील.








