• Home
  • ताज्या बातम्या
  • गोकुळ गाजवणारे सतेज पाटील किती श्रीमंत? महायुतीला कसं दिलं आव्हान?
राजकारण

गोकुळ गाजवणारे सतेज पाटील किती श्रीमंत? महायुतीला कसं दिलं आव्हान?

Satej Patil Net Worth
24

Satej Patil Net Worth: गोकुळची निवडणूक जाहीर झाली आणि राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं…या निवडणुकीत बंटी पाटील (Bunty Patil) विरूद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळाली…राज्यात सत्ता असलेल्या महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली, तीन मंत्री, दहा आमदार आणि दोन खासदार निवडणुकीच्या मैदानात उतरले… मात्र गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटलांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बाजी मारली… महायुतीच्या दिग्गज नेत्यांसमोर सतेज पाटलांनी २५ पैकी १३ जागा जिंकत गोकुळची सत्ता मिळवलीय…त्यामुळे सध्या राज्यभरात एकच नाव चर्चेत पाहायला मिळत आहे , ते म्हणजे सतेच उर्फ बंटी पाटील…एकट्या बंटी पाटलांनी सर्वच महायुतीच्या नेत्यांना पाणी पाजलंय…पण बंटी पाटलांनी हे कसं करून दाखवलंय…त्यांची एकूण संपत्ती किती आहे?

गोकुळ गाजवणारे सतेज पाटील किती श्रीमंत?

गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची कायदेशीर मूदत 4 मे 2026 रोजी संपली होती…मूदत संपल्यानंतर तिथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती…हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात गेलं होतं…यावेळी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारत लवकर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले..आणि निवडणूक लागली… मुख्यमंत्री, तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार आणि दहा आमदारांची फौज मैदानात उतरवून सतेज पाटलांना घेरण्याची रणनीती महायुतीने आखली…एकटे बंटी पाटील लढत असल्याने महायुतीचा विजय होणार असा दावा केला जात होता…

महायुतीच्या नेत्यांनी मतदारांना शपथा घ्यायला लावल्याची माहिती आहे…मात्र १९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला आणि वाराच फिरला…. कारण गोकुळच्या 25 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने १३ जागा जिंकल्या. तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील महायुती समर्थित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला १२ जागांवर समाधान मानावं लागलं. म्हणजेच अवघ्या एका जागेच्या फरकाने सतेज पाटलांच्या आघाडीने गोकुळच्या संचालक मंडळावर बहुमत मिळवलं..

या निवडणुकीत एकूण ५ हजार ४१८ पात्र मतदारांपैकी ५ हजार ४१६ मतदारांनी मतदान केल्याची माहिती आहे… म्हणजेच मतदानाची टक्केवारी जवळपास शंभर टक्के होती… जिल्ह्यातील ३५ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. दोन्ही आघाड्यांचे मिळून ५० उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते… त्यामुळे प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं…मतमोजणीदरम्यानही मोठी चुरस पाहायला मिळाली… सुरुवातीच्या निकालांमध्ये सतेज पाटलांच्या आघाडीने १४ जागांवर आघाडी घेतल्याचं समोर आलं होतं. मात्र एका जागेच्या फेरमतमोजणीनंतर महायुतीच्या जागांची संख्या १२ वर पोहोचली आणि सतेज पाटलांच्या आघाडीचा अंतिम आकडा १३ वर स्थिरावला… त्यामुळे शेवटपर्यंत निकालाबाबत उत्सुकता कायम होती.

हेही वाचा : राहुल गांधी व्हिएतनामला का गेले? परतल्यानंतर सत्ता बदल होणार?

सतेज पाटील यांची एकूण संपत्ती किती? (Satej Patil Net Worth)

या निवडणुकीत महायुतीला आणखी एक धक्का बसला तो म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र आणि गोकुळचे माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ यांचा पराभव झाला… त्याचबरोबर भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांनाही पराभव स्वीकारावा लागला… त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीतील निकालाची राज्यभर चर्चा झाली…
पण सतेज पाटलांनी (Satej Patil) एवढ्या मोठ्या महायुतीच्या आघाडीला आव्हान कसं दिलं? याचं उत्तर त्यांच्या प्रचारातील भूमिकेत पाहायला मिळतं… गोकुळ हा कोल्हापूरचा दूध संघ आहे आणि गोकुळचे निर्णय कोल्हापुरातच झाले पाहिजेत, अशी भूमिका सतेज पाटलांनी प्रचारादरम्यान मांडली होती… गोकुळच्या निर्णयांवर बाहेरील राजकीय नेतृत्वाचा प्रभाव असू नये, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला…. शेतकरी नेते राजू शेट्टी यांचाही त्यांच्या आघाडीला पाठिंबा मिळाला होता…महत्त्वाचं म्हणजे गोकुळच्या अस्मितेचा मूद्दा सतेज पाटलांनी उपस्थित केला…सतेज पाटलांनी आपली जादू दाखवली आणि कोल्हापुरात बाप तो बाप रहेगा हे गाणं वाजताना पाहायला मिळालं…कार्यकर्ते आनंदात गुलाल उधळताना दिसले..

आता पाहूयात की सतेज पाटलांची संपत्ती किती आहे…कारण गोकुळच्या निवडणुकीतील विजयामुळे त्यांच्या राजकीय ताकदीसोबतच आर्थिक संपत्तीचीही चर्चा सुरू झालीय… सतेज पाटलांनी २०२१ च्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या स्वतःच्या नावावर सुमारे ३२ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता होती… त्यामध्ये १६ कोटी २८ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आणि १६ कोटी ४७ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता होती.
या प्रतिज्ञापत्रानुसार सतेज पाटलांच्या जंगम मालमत्तेत बँकांमधील ठेवी, गुंतवणूक, विमा आणि इतर आर्थिक मालमत्तेचा समावेश होता… तर स्थावर मालमत्तेत कोल्हापूर, मुंबई आणि इतर ठिकाणच्या जमिनी आणि मालमत्तांचा समावेश होता. त्याचबरोबर सतेज पाटलांच्या नावावर सुमारे १४ लाख ८३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असल्याची नोंदही करण्यात आली होती.

हेही वाचा : Maharashtra Politics: ५०० कोटींच्या कथित व्यवहाराची ऑडिओ क्लिप व्हायरल; शिंदे-जरांगे प्रकरणात नवा ट्विस्ट!

स्वतःची मालमत्ता आणि कुटुंबाची मालमत्ता यातील फरक (Bunty Patil Net Worth)

विशेष म्हणजे सतेज पाटलांची स्वतःची मालमत्ता आणि कुटुंबाची एकत्रित घोषित मालमत्ता यामध्ये फरक आहे. २०२१ च्या प्रतिज्ञापत्रानुसार सतेज पाटील, त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाची मिळून एकूण घोषित मालमत्ता ४० कोटी ९१ लाख ९४ हजार ८४८ रुपये होती…म्हणजे जवळपास 41 कोटी रूपये… त्याचबरोबर एकत्रित घोषित देणी १९ कोटी २० लाख ९१ हजार १३ रुपये होती…..आता ही संपत्ती वाढली असेल किंवा यात घट झाला असेल…पण संपत्तीचा आकडा 2026 मध्ये बदलेला असेल…

सतेज पाटील यांचा राजकीय प्रवासही महत्त्वाचा आहे. कोल्हापूरच्या राजकारणात बंटी पाटील म्हणून ओळख असलेले सतेज पाटील हे काँग्रेसचे नेते आहेत… त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमध्ये त्यांचा दीर्घकाळ सहभाग राहिलाय. त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत त्यांनी मिळवलेला विजय हा त्यांच्या राजकीय प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरलाय…आता गोकुळच्या निकालानंतर बंटी पाटलांची जिल्हाभरात मोठी ताकद वाढण्याची शक्यता आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts