• Home
  • ताज्या बातम्या
  • टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाला नवे वळण; हरियाणातून तिघे ताब्यात, तपासात महत्त्वाचे धागेदोरे!
मनोरंजन

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाला नवे वळण; हरियाणातून तिघे ताब्यात, तपासात महत्त्वाचे धागेदोरे!

Tiger Shroff Firing Case
2
Tiger Shroff Firing Case: नुतकंच बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबार हल्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई क्राईम ब्रँचने हरियाणातून आणखी तीन जणांना ताब्यात घेतले असून, कथित आर्थिक व्यवहार आणि शस्त्रपुरवठ्याच्या दुव्यांचा तपास सुरू आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff firing case) याच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात तपासाला वेग आला आहे. या घटनेच्या तपासादरम्यान मुंबई क्राईम ब्रँचने (Mumbai Crime Branch) हरियाणातून आणखी तीन जणांना घेतल्याची (Haryana suspects) माहिती समोर आली आहे. समीर, जतीन आणि अंकित अशी या तिघांची नावे सांगितली जात आहेत. या कारवाईमुळे गोळीबारामागील (Tiger Shroff attack) कथित आर्थिक व्यवहार आणि शस्त्रपुरवठ्याच्या दुव्यांचा शोध घेण्यास पोलिसांना मदत होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff latest news) गाडीवर गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. या हल्ल्यात तीन जणांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. घटनेशी संबंधित व्हिडीओही समोर आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांसमोर हल्ल्याचे नियोजन, आरोपींची हालचाल आणि त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींची भूमिका असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आले आहेत.

हेही वाचा: IndiaAI Fellowship 2026: विद्यार्थ्यांना ₹२ लाखांपर्यंत आर्थिक मदत; अर्जाची अंतिम तारीख काय?

बॉलिवूड कलाकारांच्या निवासस्थानांची रेकी

तपासातील माहितीनुसार, हल्ल्यापूर्वी काही बॉलिवूड कलाकारांच्या निवासस्थानांची रेकी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अमिताभ बच्चन, आमिर खान, सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्या घरांबाहेरील सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर टायगर श्रॉफला लक्ष्य करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या बाबींची अधिकृत पुष्टी तपास यंत्रणांकडून होणे महत्त्वाचे आहे.

आरोपींनी अंधेरी परिसरात वारंवार हॉटेल बदलल्याचे तसेच मुंबईजवळ गोळीबाराचा सराव केल्याचेही तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हा हल्ला अचानक घडलेला नसून त्यामागे पूर्वनियोजन होते का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

या प्रकरणात आता नव्याने ताब्यात घेतलेल्या समीरवर हल्ल्याच्या नियोजनात तो सहभाग असल्याचा आरोप आहे. त्याने अनिल पंडित आणि कथित शूटर रेहान यांच्यात मध्यस्थी करत पैसे आणि शस्त्रे पुरवल्याचा संशय पोलिसांना आहे. समीर, जतीन आणि अंकित या तिघांची चौकशी सुरू असून, त्यांच्याकडून या कथित नेटवर्कविषयी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा: Todays Horoscope 23 October 2026 : शुक्रवारचा दिवस कोणासाठी ठरणार खास? मेष ते मीन, जाणून घ्या १२ राशींचे भविष्य

या तिघांना मुंबईतील खंडणीविरोधी पथकाकडे ठेवण्यात आल्याचे वृत्त असून, त्यांना किल्ला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, याआधी अटक करण्यात आलेल्या तीन मुख्य आरोपींना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आहे.

पोलिसांसमोर आता आरोपींनी वापरलेले दोन मोबाईल फोन शोधण्याचेही आव्हान आहे. या फोनमधून हल्ल्याचे नियोजन, संपर्क आणि आर्थिक व्यवहारांबाबत महत्त्वाचे पुरावे मिळू शकतात, असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे.

एकूणच, टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आणखी तीन जणांना ताब्यात घेतल्याने तपासाला नवी दिशा मिळाली आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण, सर्व आरोपींची भूमिका आणि कथित आर्थिक व्यवहार याबाबतचे अंतिम निष्कर्ष पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts