• Home
  • गुन्हा
  • Tiger Shroff Firing Case : मुंबईत कलाकार सुरक्षित आहेत का? टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर मोठे प्रश्न!
Mumbai

Tiger Shroff Firing Case : मुंबईत कलाकार सुरक्षित आहेत का? टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर मोठे प्रश्न!

Tiger Shroff Firing Case
12

Tiger Shroff Firing Case : बिश्नोई गँगची सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच दहशत पाहायला मिळत आहे…आता बिश्नोई गँगने अभिनेता टायगर श्राफवर ( Tiger Shroff ) गोळीबार केला आहे…बिश्नोई गँगने एकामागून एक बॉलिवूड कलाकारांवर गोळीबार सुरू केला आहे…यापूर्वी बिश्नोई गँगने अभिनेता सलमान खान, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्यावर गोळीबार केला होता…आता बिश्नोई गँगने टायगर श्रॉफला लक्ष केलंय…पण बिश्नोई गँगने टायगरवर गोळीबार का केलाय? फक्त सलमान सोबत काम केल्यानेच हा गोळीबार झाला आहे का? बिश्नोई गँग वारंवार बॉलिवूड अभिनेत्यांनाच का टार्गेट करत आहे? जेलमध्ये लॉरेन्स बंद असताना त्याची टोळी बाहेर कशी काम करत आहे?

टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; मुंबईच्या सुरक्षेवर प्रश्न ( Tiger Shroff Firing Case )

मुंबईतील हाय-प्रोफाइल आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या जुहू परिसरात रविवारी संध्याकाळी बॉलिवूड अभिनेता टायगर श्राफच्या गाडीवर तीन अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केल्याने संपूर्ण बॉलिवूडसह देशात खळबळ उडाली आहे… या भीषण हल्ल्यातून अभिनेता टायगर श्राफ सुखरूप बचावला असला, तरी या गोळीबारात त्याचा कार चालक आणि रस्त्यावरून जाणारा एक ऑटोरिक्षा चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे… दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत… या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला… या हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाचा वापर करून सोशल मीडियावर या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे…अनिल पंडित आणि हरमन संधू यांच्या नावाच्या अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे….

टायगर श्रॉफ फुटबॉल खेळून घरी जात असताना जुहूतील पुष्पा पार्क परिसरात तीन अज्ञात व्यक्तींनी त्याच्या गाडीवर गोळीबार केल्याची माहिती आहे… घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला असून हल्लेखोरांची ओळख आणि गोळीबारामागील कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे… सर्वांनाच प्रश्न पडलाय की टायगर श्रॉफवर ( Tiger Shroff ) बिश्नोई गँगने का गोळीबार केला आहे…तर याबाबत बिश्नोई गँगने जबाबदारी स्विकारत म्हटलंय की टायगर श्रॉफ सलमान खानसोबत काम करत आहे…आम्ही त्याला आधीच सलमान खानपासून दूर राहण्याची ताकीद दिली होती..पण त्याने ऐकले नाही…जो कुणी अभिनेता सलमान खानसोबत काम करेल, तो आमच्या निशाण्यावर राहिलं.. आम्ही त्यांना सोडणार नाही…. टायगर श्राफ हा सलमान खानचा अत्यंत जवळचा मानला जातो आणि सलमानसोबत सातत्याने काम करत राहिल्यामुळेच त्याला थेट लक्ष्य करण्यात आल्याचे म्हटलं जात आहे…

हेही वाचा : Tiger Shroff Fitness: ना शॉर्टकट, ना क्रॅश डाएट! टायगर श्रॉफ असा राखतो फिटनेस, जाणून घ्या त्याचं डाएट रुटीन

गोळीबारानंतर सोशल मीडियावर जबाबदारी स्वीकारल्याचा दावा

याप्रकरणी आता मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया देत आरोपींना सोडणार नाही, असं म्हटलं आहे…फडणवीसांनी मुंबई पोलीस आयुक्तांना फोन करून याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत…फडणवीसांनी जरी पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले असले तरीही बॉलिवूड कलाकारांवर गोळीबार होण्याची ही पहिलीच घटना नाही…एप्रिल २०२४ रोजी अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या घटनेनंतर लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) भाऊ अनमोल बिश्नोई याच्या नावाने सोशल मीडियावर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. काळवीट शिकार प्रकरणावरून सलमान खानला बिश्नोई गँगकडून यापूर्वीही धमक्या देण्यात आल्या होत्या..

यानंतर कॉमेडियन कपिल शर्माही गुन्हेगारी टोळ्यांच्या निशाण्यावर आला. कॅनडातील त्याच्या ‘कॅप्स कॅफे’वर जुलै, ऑगस्ट आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये तीन वेळा गोळीबार झाला… यातील हल्ल्यांची जबाबदारी बिश्नोई गँगशी संबंधित व्यक्तींनी स्वीकारली होती. सलमान खानसोबतच्या संबंधांमुळे कपिल शर्माला लक्ष्य केल्याचा दावा गँगशी संबंधित व्यक्तीने केला होता. या घटनांनंतर कपिल शर्माच्या मुंबईतील घराची सुरक्षाही वाढवण्यात आली होती…

हेही वाचा : टायगर श्रॉफवर गोळीबार कोणी केला? पोलिसांच्या तपासात काय समोर आलं?

सलमान खान, कपिल शर्मा आणि रोहित शेट्टीशी संबंधित घटनांचा संदर्भ

केवळ अभिनेतेच नाही, तर दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि गायक एपी ढिल्लों यांच्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनांमध्येही बिश्नोई गँगचं नाव समोर आलं आहे… रोहित शेट्टीच्या निवासस्थानाबाहेरील गोळीबाराची जबाबदारी गँगशी संबंधित व्यक्तींनी स्वीकारल्याचं वृत्त होतं. जून २०२६ मध्ये एपी ढिल्लोंच्या व्हँकुव्हरमधील घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारीही गँगने स्वीकारल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती..महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची तर बिश्नोई गँगने गोळीबार करून हत्या केली….त्यामुळे या गँगची चांगलीच दहशत पाहायला मिळत आहे…

बिश्नोई गँगकडून बॉलिवूडमधील बड्या कलाकारांना वारंवार टार्गेट का केले जात आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल… तर सलमानच्या पाठीशी उभे राहणाऱ्या किंवा त्याच्या संपर्कात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भीती दाखवणे हा या गँगचा हेतू आहे… दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे मुंबई चित्रपटसृष्टीत स्वतःची प्रचंड दहशत निर्माण करणे हे आहे… बॉलिवूडसारख्या ग्लॅमरस आणि जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या क्षेत्रातील मोठ्या स्टार्सवर हल्ले केल्यास गँगला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रसिद्धी मिळते… या प्रसिद्धीच्या जोरावर चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळणे आणि संपूर्ण इंडस्ट्रीवर आपले नियंत्रण मिळवणे हा या टोळीचा अजेंडा आहे. 90 च्या दशकात ज्याप्रमाणे दाऊद इब्राहिम किंवा छोटा राजन यांसारख्या अंडरवर्ल्ड डॉननी मुंबई फिल्म इंडस्ट्रीला आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला होता, अगदी त्याच जुन्या पॅटर्नचा वापर करून बिश्नोई गँग आता बॉलिवूडवर आपले वर्चस्व गाजवू पाहत असल्याची चर्चा आहे …बिश्नोई गँगकडून आता बॉलिवूड कसं सुरक्षित राहणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts