• Home
  • देश
  • Donald Tusk India Visit : पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क उद्यापासून भारत दौऱ्यावर; संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञान सहकार्यावर भर
Top News

Donald Tusk India Visit : पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क उद्यापासून भारत दौऱ्यावर; संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञान सहकार्यावर भर

Donald Tusk India Visit
14
Donald Tusk India Visit : पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येणार असून, २२ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची द्विपक्षीय बैठक होणार आहे. संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, अंतराळ तंत्रज्ञान आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. नवी दिल्ली आणि बंगळुरू येथील व्यापार मंचांमधून दोन्ही देशांतील व्यावसायिक संबंधांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क(Donald Task) २१ ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून होणाऱ्या या दौऱ्यात भारत आणि पोलंड यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, अंतराळ तंत्रज्ञान आणि नवीकरणीय ऊर्जा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्याबाबत या दौऱ्यात चर्चा होणार आहे.

२२ ऑक्टोबरला मोदी-टस्क यांची द्विपक्षीय बैठक  (Bilateral Meet)

डोनाल्ड टस्क २२ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत भारत-पोलंड संबंधांचा आढावा घेतला जाणार असून, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेते विचारांची देवाणघेवाण करणार आहेत. ऑगस्ट २०२४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या पोलंड दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधील संबंधांना धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आगामी बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

संरक्षण आणि औद्योगिक सहकार्यावर भर

भारत आणि पोलंड यांच्यात संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने या दौऱ्याला महत्त्व आहे. संरक्षण उत्पादन, औद्योगिक भागीदारी आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण यांसारख्या विषयांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, भारत आणि पोलंड या दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे.

हेही वाचा : मोठी बातमी! आता कोट्यवधी मुलांना मिळणार SpaceX च्या मालकीत हिस्सा? Elon Musk यांच्या प्लॅनमागचं कारण काय?

दिल्ली आणि बंगळुरूमध्ये भारत-पोलंड व्यापार मंच (India – Poland)

या दौऱ्यादरम्यान २२ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीमध्ये, तर २३ ऑक्टोबर रोजी बंगळुरूमध्ये भारत-पोलंड व्यापार मंच आयोजित करण्यात येणार आहे. या मंचाच्या माध्यमातून दोन्ही देशांतील व्यावसायिक प्रतिनिधींना परस्पर संवाद साधण्याची आणि नव्या व्यावसायिक संधी शोधण्याची संधी मिळेल. व्यापार, गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्याला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

बंगळुरू भेटीत तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रावर चर्चा (Bengaluru Meet)

डोनाल्ड टस्क आपल्या भारत दौऱ्यात बंगळुरूलाही भेट देणार आहेत. येथे ते माहिती तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातील व्यावसायिक प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, संशोधन आणि नवीकरणीय ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नव्या संधी शोधण्यावरही भर दिला जाणार आहे.

पोलंडच्या अर्थमंत्र्यांसह व्यावसायिक शिष्टमंडळ (Business Delegation)

डोनाल्ड टस्क यांच्यासोबत पोलंडचे वित्त व अर्थव्यवस्थामंत्री आंद्रेज डोमांस्की आणि मोठे व्यावसायिक शिष्टमंडळ भारतात येणार आहे. या शिष्टमंडळाच्या सहभागामुळे दोन्ही देशांतील उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

भारत-पोलंड धोरणात्मक भागीदारीला चालना

भारत आणि पोलंड यांच्यातील संबंधांना २०२४ मध्ये धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाल्यानंतर व्यापार, संरक्षण, शिक्षण, संस्कृती, संशोधन आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर भर दिला जात आहे. डोनाल्ड टस्क यांचा आगामी दौरा या भागीदारीला पुढे नेण्याची संधी ठरणार आहे. तसेच भारत आणि युरोपीय संघ यांच्यातील धोरणात्मक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनेही या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. (Defence Trade Technology)

हेही वाचा :  Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत वाढला तणाव! दोन जहाजांवर हल्ले, दोन भारतीय खलाशी बेपत्ता; समुद्रात शोधमोहीम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts