Malaika Arora News: बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या अभिनयामुळे किंवा फॅशनमुळे नव्हे, तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटोंमुळे तिच्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अबू धाबीमधील शेख झायेद ग्रँड मशिदीला भेट देताना मलायका पारंपरिक पोशाखात दिसली. मात्र, तिच्यासोबत असलेला योग उद्योजक सर्वेश शशी याच्यामुळे या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मलायका अरोरा तिच्या स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. यावेळी अबू धाबीतील प्रसिद्ध शेख झायेद ग्रँड मशिदीला भेट देताना तिने शरीर आणि डोकं झाकणारा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिच्या या लूकवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
सर्वेश शशीसोबतचे फोटो व्हायरल
मलायकासोबत सर्वेश शशी दिसल्याने त्यांच्या नात्याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे. सर्वेशने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघे एकत्र दिसत आहेत. एका फोटोमध्ये ते मशिदीच्या परिसरात दिसतात, तर दुसऱ्या छायाचित्रात दोघे कारमध्ये आहेत. या फोटोमध्ये मलायका सर्वेशच्या खांद्यावर डोकं ठेवून असल्याचं दिसतं. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
कोण आहे सर्वेश शशी?
सर्वेश शशी हा योग आणि वेलनेस क्षेत्रातील उद्योजक आहे. तो ‘SARVA’ या योग आणि वेलनेस ब्रँडशी संबंधित आहे. मलायका आणि सर्वेश यांच्यात व्यावसायिक संबंधही आहेत. दोघे ‘दिवा योगा’ या महिलांसाठीच्या योगविषयक उपक्रमाशी संबंधित आहेत.
त्यामुळे दोघांची एकत्रित उपस्थिती ही व्यावसायिक मैत्रीचाही भाग असू शकते. केवळ फोटोंवरून त्यांच्या नात्याबाबत निष्कर्ष काढता येणार नाही. सध्या मलायका आणि सर्वेशच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा सुरू असून, त्यांच्या नात्याबाबत अधिकृत माहिती समोर येते का, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.









