Maharashtra Teacher Graduate Election 2026: आज, २३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील ५ शिक्षक-पदवीधर मतदारसंघांत मतदान होत आहे. अवघे ५ मतदारसंघ, १८२ उमेदवार आणि सुमारे १० लाख मतदार! या निवडणुकीत मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Maharashtra Teacher-Graduate Constituency Election: महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या (Maharashtra Voting निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. पाच मतदारसंघांमध्ये (Maharashtra MLC Election) आज मतदार होत असून, तब्बल १८२ उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. प्रस्थापित पक्षांचे उमेदवार, बंडखोर आणि अपक्ष यांच्यात रंगलेल्या या लढतीत मतदारांचा कौल कोणाला मिळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पाच मतदारसंघ, अनेक दिग्गज आणि प्रतिष्ठेची लढाई!
पुणे, नागपूर, अमरावती आणि मराठवाडा या विभागांतील शिक्षक व पदवीधर मतदारसंघांमध्ये (Teacher Constituency Election) राजकीय चुरस पाहायला मिळत आहे. पक्षीय समीकरणं, स्थानिक प्रश्न आणि उमेदवारांची ताकद यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. काही ठिकाणी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसमोर बंडखोरांनी आव्हान उभं केलं असून, काही मतदारसंघांमध्ये थेट लढतींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सकाळी 8 ते दुपारी 4; मतदारांना मतदानाचं आवाहन
आज, 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक यंत्रणेकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. पात्र शिक्षक आणि पदवीधर मतदारांनी मतदान करताना निवडणूक आयोगाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मतदानासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, भारतीय पासपोर्ट तसेच निवडणूक प्रशासनाने मान्य केलेली इतर ओळखपत्रं सोबत ठेवणं आवश्यक आहे. मतपत्रिका वैध ठरण्यासाठी मतदानाची पद्धत आणि त्यासंबंधीच्या अधिकृत सूचनांची काळजीपूर्वक नोंद घ्यावी.
2,419 मतदान केंद्रांवर मतदानाची तयारी
या निवडणुकीसाठी पाच मतदारसंघांमध्ये एकूण 2,419 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, पुणे पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक 3 लाख 88 हजार मतदार आहेत, तर अमरावती शिक्षक मतदारसंघात सुमारे 35 हजार मतदार आहेत. मतदानानंतर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असल्याने निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा: IndiaAI Fellowship 2026: विद्यार्थ्यांना ₹२ लाखांपर्यंत आर्थिक मदत; अर्जाची अंतिम तारीख काय?
कोणत्या मतदारसंघात कोणामध्ये लढत?
पुणे पदवीधर मतदारसंघ
स्मिता जाधव — भाजप
हर्षदा देशमुख — राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
पुणे शिक्षक मतदारसंघ
कौस्तुभ गावडे — भाजप
सचिन सानप — शिवसेना (शिंदे गट)
जयंत आसगावकर — काँग्रेस
नागपूर पदवीधर मतदारसंघ
सुधाकर कोहळे — भाजप
अभिजीत वंजारी — काँग्रेस
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ
सतीश चव्हाण — राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
प्रतापसिंह पाटील — राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
दिलीप घुगे — शिवसेना (ठाकरे गट)
अमरावती शिक्षक मतदारसंघ
किरण सरनाईक — शिवसेना (शिंदे गट)
आदिती पोहरे — काँग्रेस
मतदारांचा कौल कुणाला?
शिक्षक आणि पदवीधरांचे प्रश्न, स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणं आणि उमेदवारांची वैयक्तिक ताकद या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. बंडखोर उमेदवार किती मतं खेचणार, प्रमुख पक्ष आपापले गड राखणार का आणि कोणाला अनपेक्षित यश मिळणार, याची उत्तरं मतमोजणीनंतरच स्पष्ट होतील.





