गणपती बाप्पा यांना लहानपणापासून
मोदक आणि लाडू प्रचंड प्रमाणात आवडतात
एकदा बाप्पाच्या भक्ताने त्यांना
लाडू आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण केला
आवडता नैवेद्य मिळाल्यावर बापांनी पोटभर
नैवेद्य खाऊन सोबत शिधा देखील बांधून घेतला
आणि ते उंदरावर बसून जाऊ लागले…
उंदराला देखील बाप्पांचे वजन तोलवेना,
तेवढ्यात अचानक उंदरा समोरून
भला मोठा साप आडवा गेला
त्यामुळे उंदराने घाबरून उडी मारली
यामुळे गणपती बाप्पा खाली पडले,
आणि त्यांनी बांधून घेतलेल्या शिध्यातील
मोदक लाडू देखील खाली पडले
गणपती बाप्पांची हि अवस्था पाहून
आकाशातील चंद्र मोठ्याने हासला,
बाप्पांचे मोठे पोट, हत्तीची सोंड म्हणत
बाप्पांची टिंगल उडवायला सुरुवात केली
यावर बाप्पांना राग आला, आणि त्यांनी चंद्राला शाप दिला
“हे चंद्रा तू माझ्यावर हसलास, तुला काय वाटतं तू खूप देखणा आहेस…?
मी तुला शाप देतो कि, तू आकाशातून गायब होशील,
आणि पुन्हा कधीच दिसणार नाही…”
हे ऐकून चंद्राला आपली चूक समजली
आणि त्याने गणपती बाप्पांची क्षमा मागितली…
चंद्राला केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याने
बापांनी शापाचा प्रभाव कमी केला…
बाप्पा म्हणाले, मी माझा शाप पूर्णपणे परत घेऊ शकत नाही
परंतु त्याचा प्रभाव कमी करू शकतो,
ज्यामुळे चंद्र पूर्णपणे नाहीसा होणार नाही तर
त्याचा आकार हळूहळू कमी होत जाईल…
या शापानुसार चंद्राच्या कला दर पंधरा दिवसांनी
वाढत आणि कमी होत जातात…
आणि जेव्हा चंद्र पूर्णपणे नाहीसा होतो
तेव्हा अमावस्या होते आणि जेव्हा
प्रकाशमान होतो तेव्हा पौर्णिमा होते…
चंद्राची कला जशी वाढते-कमी होते,
तसच आपले जीवण देखील कधी तेजस्वी,
कधी मंद असते,
परंतु आपण आपल्या चुका मान्य केल्या तर
प्रत्येक अमावस्येनंतर नवीन पौर्णिमा नक्की येते…
पुढील भागात पाहूया….
कार्तिकेय आणि गणपतीची शर्यत:प्रदक्षिणेतील युक्ती