Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब
Top News

महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

Sharad Pawar
68

Sharad Pawar’s Rajya Sabha election : राज्यासह संपूर्ण देशात राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे 6 उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील. तर एक जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे. सध्या या एका जागेवरून कोणाला दिल्लीला पाठवायचे याबाबत चर्चा सुरू असताना जेष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेत ही अधिकृत घोषणा केलीय.

शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवले निश्चित झाले

महाविकास आघाडीचे नेते यासाठी एकमेकांची भेट घेताना पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवले निश्चित झाले आहे. शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात यावे यासाठी राष्ट्रवादीने मोठी फिल्डिंग लावली आली. खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्यसभेच्या जागेच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. मी आणि आमच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली आहे. काँग्रेसने देखील सु्प्रिया सुळे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत अधिकृत पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शरद पवार खासदार होणार हे निश्चित झाले आहे.

राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुकीची घोषणा

राज्यासह संपूर्ण देशात राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे 6 उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील. तर एक जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे. सध्या या एका जागेवरून कोणाला दिल्लीला पाठवायचे याबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीचे नेते यासाठी एकमेकांची भेट घेताना पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे. याबाबतच्या घडामोडींना वेग आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांची उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर भेट

शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात यावे यासाठी राष्ट्रवादीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्यसभेच्या जागेच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. मी आणि आमच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली आहे आणि आम्ही काँग्रेसशी देखील चर्चा करत आहोत. आम्ही शरद पवार यांना राज्यसभा निवडणूक तुम्ही लढावी असा आग्रह केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts