काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस झाला. 75 वा वाढदिवस खरंच कोणाच्याही आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. यासोबतच प्रत्येकाच्या मनात येणारा प्रश्न म्हणजे मोदी कधी निवृत्त होणार. यावर आता शरद पवारांनी भाष्य केले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 व्या वर्षात पदार्पण केले असून त्यांना राजकारणापासून बॉलिवूड, देश विदेशांतून त्यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. इंस्टाग्राम, ट्विटर यासारख्या समाज माध्यमांवर काल #modi_birthday ट्रेंड वर होतं. यासोबतच प्रत्येकाच्या मनात हाच एक प्रश्न निर्माण झाला कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वारसाचे झालेत , मग आता निवृत्त कधी होणार..? याच प्रश्नावर आता शरद पवारांनी वक्तव्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार म्हणाले कि, “पंतप्रधानांनी 75 व्या वर्षांत पदार्पण केले, मी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. मी त्यांना पत्र लिहीलं, ट्विटही केलं. राजकारणामध्ये आम्ही सगळे यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारात वाढलेले लोक आहे, त्यामुळे या प्रसंगी आम्ही कोणतेही राजकारण मध्ये आणत नाही. आणि राजकारण मध्ये न आणता सभ्य आणि सुस्कृंतपणा याचं दर्शन दाखवलं पाहिजे, याच दृष्टीने देशातील आणि देशाबाहेरच्या लोकांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले, त्यांना शुभेच्छा ही दिल्या, जे योग्य आहे. तसेच माझा 75 वा वाढदिवस होता, तेव्हा मोदी स्वत: आले, तिथे त्यांनी राजकारण आणलं नाही आणि आता आम्हीही आणू इच्छित नाही. आमच्या शुभेच्छा आहे.”
मात्र 75 व्या वर्षानंतर संविधानिक पदावर थांबायचं की नाही यावरून प्रश्न विचारला असता, त्यांनी उत्तर दिलं कि, मी थांबलो नाही, त्यामुळे मला बोलायचा अधिकार ही नाही. मी आता 85 वर्षाचा आहे. म्हणजे आता 75 संपून 10 वर्ष झाली असेही कोल्हापुरात पत्रकारांसोबत बोलताना ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्ती घेण्यावरून बऱ्याच काळापासून उलटसुलट चर्चा सुरू होती. तर काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील एक वक्तव्य केलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते कि, जेव्हा ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर कोणत्याही नेत्याला शाल दिली जाते, तेव्हा त्याला एक अर्थ असतो. तो अर्थ म्हणजे त्याचे आता वय झाले. तुम्ही इतरांना संधी द्यायला हवी. या मुद्द्यावरूनच विरोधकांनी मोदींच्या निवृत्तीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.