Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर बनत आहे भारतातील इलेक्ट्रिकल वेहीकलची राजधानी
Top News

छत्रपती संभाजीनगर बनत आहे भारतातील इलेक्ट्रिकल वेहीकलची राजधानी

छत्रपती संभाजीनगर हे शहर आता फक्त ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा म्हणूनच नव्हे, तर देशातील इलेक्ट्रिकल वेहीकल (Electric Vehicle) उत्पादनाचे प्रमुख केंद्र (Hub) म्हणूनही झपाट्याने उदयास येत आहे. अलीकडील अनेक अहवाल, गुंतवणुकीची घोषणाआणि धोरणात्मक निर्णयांमुळे येत्या काही वर्षांत हे शहर भारतातील इ.व्ही राजधानी (EV Capital) बनू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पायाभूत सुविधांचा मजबूत पाया आहे छत्रपती संभाजी नगर

या औद्योगिक क्रांतीमागे छत्रपती संभाजीनगरचे मोक्याचे भौगोलिक स्थान आणि पायाभूत सुविधांचा विकास हे प्रमुख घटक आहेत.

Delhi-Mumbai Industrial Corridor (DMIC): DMIC चा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या Aurangabad Industrial City (AURIC) ने गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक औद्योगिक शहरांपैकी एक म्हणून विकसित होत आहे.

Nagpur-Mumbai Samruddhi Expressway: या महामार्गामुळे छत्रपती संभाजीनगरला नागपूर, मुंबई, पुणे अशा औद्योगिक केंद्रांशी जलद कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. त्यामुळे लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन व्यवस्थापन (Supply Chain Management) अधिक कार्यक्षम झाले आहे.

Industrial Expansion: राज्य सरकारने सुमारे आठ हजार एकर जमीन औद्योगिक विकासासाठी अधिग्रहित केली असून, ही जमीन विशेषतः EV आणि Green Mobility प्रकल्पांना प्राधान्य देण्यासाठी वापरली जात आहे.

मोठ्या कंपन्यांचे लक्ष

आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय कंपन्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये EV उद्योगात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारची सहाय्यक धोरणांचा फायदा – महाराष्ट्र EV Policy 2025

JSW Green Mobility: ६३६ एकर जागेत EV, Hybrid Vehicles, Charging Modules व Battery Systems निर्मितीसाठी गुंतवणूक.

Toyota Kirloskar Motor: ८२७ एकर जमीन घेऊन उत्पादन युनिट उभारणीस सुरुवात.

Ather Energy: इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या उत्पादनासाठी नवीन Manufacturing Units उभारत आहे.

Uno Minda: विशेषतः EV Components आणि Auto Parts निर्मितीसाठी ₹२१० कोटींची गुंतवणूक.

Hyundai, Reliance Infra, Anvi Power, Gensol Engineering: EV Cars, Lithium Battery Production आणि Green Mobility प्रकल्पांमध्ये सक्रिय सहभाग.

यामुळे छत्रपती संभाजीनगर हळूहळू राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक EV नकाशावर आपलं स्थान निर्माण करत आहे.

पायाभूत सुविधांचा मजबूत पाया आहे छत्रपती संभाजी नगर

राज्य सरकारने एप्रिल २०२५ मध्ये लागू केलेलं Maharashtra EV Policy 2025 हे EV क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी टर्निंग पॉईंट ठरलं आहे.

उत्पादकांसाठी (Producers): भांडवली गुंतवणुकीवरील सबसिडी, Loan Waivers, जमीन अधिग्रहणात सवलत.

ग्राहकांसाठी (Consumers): वाहन खरेदीवरील प्रोत्साहन, Toll Waiver, Motor Vehicle Tax आणि Registration Fees मध्ये सूट.

चार्जिंग पायाभूत सुविधा (Charging Infrastructure): शहरात आणि महामार्गांवर चार्जिंग स्टेशन्ससाठी विशेष जागा उपलब्ध करून देण्याची योजना.

संशोधन आणि विकास (R&D): EV Technology साठी State-of-the-Art R&D Centers, अनुदाने व Excellence Hubs ची निर्मिती.

Auto Components Ecosystem: छत्रपती संभाजीनगर आधीपासूनच Auto Parts Manufacturing साठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे EV Components उत्पादनाला चालना मिळत आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका

EV Hub बनण्याच्या प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

त्यांनी इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ड्राईव्ह (Industrial Investment Drive) वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. विशेषतः ऑरीच इंडस्ट्रियल सिटी (AURIC Industrial City) मध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले.

विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, विशेषतः मराठवाडा मुक्ती संग्राम दीना निमित्त, त्यांनी छत्रपती संभाजीनगरला देशाची इ. व्ही. राजधानी (EV Capital) बनवण्याचे स्वप्न जाहीर केले.

डाव्होस इकॉनॉमिक फोरम (Davos Economic Forum) सारख्या जागतिक परिषदेत त्यांनी JSW, Toyota, Hyundai सारख्या कंपन्यांच्या मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली.

Samruddhi Expressway आणि DMIC सारख्या प्रकल्पांमुळे शहराची पुरवठा साखळी व्यवस्थापन किंवा वाहतूक व पुरवठा व्यवस्था सुधारली, ज्यामुळे औद्योगिक वाढीला गती मिळाली.

पाणीपुरवठा योजना, रस्ते विकास, औद्योगिक सुविधा अशा Regional Development प्रकल्पांनाही गती देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

छत्रपती संभाजी नगर चा भविष्य कसे असेल?

तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या गुंतवणुकी व धोरणात्मक निर्णयांमुळे येत्या पाच ते सात वर्षांत छत्रपती संभाजीनगर हे देशातील EV उत्पादन आणि तंत्रज्ञानाचं सर्वात मोठं केंद्र बनू शकतं.

Sustainable Growth: हरित ऊर्जा (Green Energy) आणि EV तंत्रज्ञानाचा प्रसार.

Employment Opportunities: हजारो रोजगार निर्मिती.

Regional Transformation: मराठवाड्याच्या औद्योगिक नकाशाला नवं परिमाण.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts