बॉलिवूडमधील बहुचर्चित आणि पॉवर कपल्सपैकी एक असलेल्या कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी बऱ्याच प्रतीक्षेनंतर गोड बातमी दिली आहे. कतरिना आणि विक्की कौशल आई बाबा होणार असल्याची गूड न्यूज विकीने त्याच्या सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मागील बऱ्याच काळापासून कतरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता त्यावर शिक्का मोर्तब झाला असून लवकरच कतरीना आणि विक्की आई-बाबा होणार असल्याचं सेलिब्रिटी जोडप्यानं जाहीर केलं आहे. विक्कीच्या ने त्याच्या इंस्टाग्रामवर या संबंधित पोस्ट केल्यानंतर त्याच्या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.
कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर याबाबत गोंडस पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधील फोटोमध्ये कतरिना कैफ व्हाईट व्ही-नेकलाइन बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिचा बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसतेय. तर विक्कीने बेबी बम्पवर हात ठेवून पोज दिली आहे.
या फोटोत विक्की आणि कतरिनाच्या चेहऱ्यावर असणारा आनंद स्पष्ट दिसतोय. या सेलिब्रिटी जोडप्यानं प्रेग्नन्सी अनाउंस करताना एक क्लासी आणि कॅची पोस्ट लिहिली आहे. कतरिना आणि विक्की यांनी लिहिलंय की, “आनंद आणि कृतज्ञतेनं, आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय सुरू करणार आहोत.”