• Home
  • मनोरंजन
  • सगळं करून भागली अन् आता देवपूजेला लागली…, प्रेमानंद महाराजांचं दर्शन घ्यायला ‘ती’ बोल्ड अभिनेत्री गेली अन् ढसाढसा रडली
ताज्या बातम्या

सगळं करून भागली अन् आता देवपूजेला लागली…, प्रेमानंद महाराजांचं दर्शन घ्यायला ‘ती’ बोल्ड अभिनेत्री गेली अन् ढसाढसा रडली

poonam pandey

Actress Poonam Pandey got emotional in front of Premanand Maharaj | अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) यांचं दर्शन घेण्याचं स्वप्न अनेकांचं आहे. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी दररोज लाखो भाविक वृंदावनला (Vrindavan) जातात. यामध्ये सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटींपर्यंत (Celebrity) अनेकांचा समावेश आहे. अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींनी प्रेमानंद महाराजांची भेट घेतली आहे. यामध्ये विराट कोहली (Virat Kohli)-अनुष्का शर्मा (Anushka Sharma), राजपाल यादव (Rajpal Yadav), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांसारख्या अनेक कलाकारांनी प्रेमानंद महाराजांची भेट घेतली आहे. त्यानंतर आता महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणखी एक अशी अभिनेत्री पोहोचली आहे ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं.

हेही वाचा – दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या घराबाहेर गोळीबार; जुहू परिसरात खळबळ

कोण आहे ‘ती’ बोल्ड अभिनेत्री?

प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेण्यासाठी गेलेली अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून बोल्ड अभिनेत्री (Bold Actress) पूनम पांडे (Poonam Pandey) आहे. पूनम पांडे ही तिच्या बोल्ड (Bold) आणि हॉट (Hot) अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच ती अनेकदा वादात देखील सापडली आहे. तर आता पूनम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

पूनम पांडेचे काही फोटो आणि व्हिडीओ ‘विरल भयानी’ (Viral Bhayani) या पापाराझी (Paparazzi) अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहेत. ज्यात ती प्रेमानंद महाराजांचं प्रवचन अगदी मन लावून ऐकताना दिसत आहे. तर दुसऱ्या काही व्हिडीओंमध्ये ती भावूक होत रडताना देखील दिसत आहे. विशेष म्हणजे नेहमी अंगप्रदर्शन करणारी पूनम यावेळी मात्र पारंपारिक पोशाखात दिसली. ज्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

https://www.instagram.com/p/DVIfF75COrP/?utm_source=ig_embed&ig_rid=9c3764a4-88dd-4ce9-a992-e5b4074f8559

नेटकऱ्यांनी केलं जोरदार ट्रोल

दरम्यान, पूनमच्या या व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओवर नेटकऱ्यांनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की, सगळे कर्म, कांड केल्यानंतर देवपूजेला लागली. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, देव तुला सद्बुद्धी देवो तर काहींनी म्हटलं आहे की, सगळ्यांना बिघडवून आता स्वत: सुधारली, असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल केलं आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts